अग्निशमन विभागाच्या साहित्य खरेदीसाठी 36 लाखाची मंजुरी

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-मनपाच्या अग्निशमन विभागासाठी उपकरण आणि कर्मचार्‍यांच्या गणवेश खरेदीसाठी 35 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चाला तसेच घंटा गाड्यांवर ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत करण्यासठी 2 लाख 84 हजार रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपा स्थायी समितीची सभा सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. दरम्यान, चार विषयांना मंजूरी देण्यात आली.

कचरा संकलित केल्यानंतर घंटागाडी ओला आणि सुका असे दोन भाग करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत केली जाणार आहे. त्यासाठी 2 लाख 84 हजार रुपयाच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. दरम्यान, कचरा कुंडीचीही दोन भाग करावे, अशी सूचना पृथ्वीराज सोनवणे यांनी केली.

घंटागाडीत कोण कचरा टाकतो किंवा कोण कचरा टाकत नाही याची यादी तयार करण्याची मागणी केली असतांनाही आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे सोनवणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी उद्यापासून यादी तयार करण्यात येईल असे उत्तर दिले.

आरोग्य – बांधकाम विभागाची टोलवा टोलवी
शिवाजीनगरात ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये गटारीतील सांडपाणी व पावसाचे पाणी जात असल्याचे सांगितले. याबाबत आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाकडे तक्रार करुनही दखल न देता एकमेकांकडे टोलवा टोलवी करीत असल्याचे गायत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

मोकाट कुत्र्यांची भिती
शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याने नागरिकांमध्ये भिती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. मात्र मनपातर्फे उपाययोजना केली जात नसल्याचे सांगत र्निबीजीकरण करण्याची मागणी पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. यावर सहाय्यक आयुक्तलक्ष्मीकांत कहार यांनी र्निबीजीकरणासाठी सातवेळा निविदा देवून देखील प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले.

जीर्ण इमारतींमुळे धोका
शहरातील जीर्ण इमारतींमुळे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जीर्ण इमारतींबाबत कोणते धोरण अवलंबिले आहे. अशी विचारणा केली. यावर प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी यांनी जीर्ण इमारत खाली करतांना भाडेकरूंना कोणत्याही प्रकारचा करारनामा करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*