जिल्हाधिकार्‍यांचा अधिकार्‍यांना महिना अखेर ‘अल्टिमेटम’

0
जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे सातबारा ऑनलाईन करण्याचे काम बाकी आहे. हे ऑनलाईन करण्याचे काम करतांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुक होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच ज्यांचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे.
त्यांनी चावडीवाचन जून अखेरपर्यंत पुर्ण करावे. ऑनलाईन सातबारा उतार्‍यांचे काम महिना अखेर पर्यंत पुर्ण न केल्यास अधिकार्‍यांची कामाबाबत असलेली गोपनीय अहवालात नोंद करुन त्यांची चौकशी लावण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.

जिल्ह्यात युवा मतदार नोंदणीबाबत अल्पबचत भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, निवडणूक तहसीलदार, निवडणूक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी निंबाळकर सांगीतले की, ऑगस्ट सुरुवाती पासून सर्वांना ऑनलाईन साताबारा वाटप करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षापासून सातबारा संगणीकरणाचे काम, इडिट मॉडेलद्वारे सातबारा दुरुस्तीचे काम सुरु होते. हे काम आता अंतिम टप्पयात सुरु आहे.

ऑनलाईन सातबाराचे हा उपक्रम शासनाचा अत्यंत महत्वकांशी उपक्रम असून हे काम अत्यंत काळजीपुर्वक करण्याचे त्यांनी सांगीतले.

या कामात संबंधितांच्या एका चुकीमुळे एखाद्या व्यक्तीची मालमत्ता हरवून जावू शकते. त्यामुळे संबंधितांनी डोळ्यात तेल घालून काम करावे.

व महिना अखेरपर्यंत चावडी वाचन पूर्ण करून हाताने केलेल्या दुरुस्त्या, संगणकात फीड करून बिनचूक सातबारा ऑनलाइन उतारे करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

युवा मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन
जिल्ह्यात दि. 26 जूनच्या लोकसंख्येनुसार 1 लाख 12 हजार युवा मतदारांची नोंदणी झालेली नाही आहे. या युवकांची नोंदणी करण्यासाठी दि. 8 व 22 जुलै या दोन दिवशी विशेष युवा मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यलय, गावांमध्ये जावून नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीतून नावे कमी करीत असतांना दक्षता घ्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांनी फॅार्म सहा भरून घेण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. याप्रसंगी निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, आयुक्त जीवन सोनवणे उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*