सिव्हीलमध्ये धुम्रपान करणार्‍या 17 जणांवर दंडात्मक कारवाई

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी येतात. काही कर्मचारी धुम्रपान, तंबाखु खाऊन परिसरात अस्वच्छता करित असल्याचे लक्षात येतात.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुनिल भामरे यांनी कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली. धुम्रपान करणार्‍या 17 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सर्वसामान्य रुग्णांचे आधारवड म्हणुन जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे बघीतले जाते. रुग्णांचे हक्काचे दालन असलेल्या सिव्हीलमध्ये निदानासाठी रुग्णांची गर्दी होते. रूग्ण,नातेवाईक आणि कर्मचारीच याठिकाणी अस्वच्छता निर्माण करत असल्याचा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे.

त्यामुळे गुटखा आणि तंबाखुने येथल्या भिंती, स्वच्छता गृहे रंगली आहेत. हा प्रकार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुनिल भामरे यांनी गेल्या काही दिवसांपासून पथकाची निर्मिती करून धुम्रपानविरोधी मोहिम हाती घेतली आहे. या पथकाकडून रुग्णालयात कारवाई करण्यात येत आहेत.

 

LEAVE A REPLY

*