योगोत्सव…!

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी योग प्रार्थना, टाळ्यांचा पाऊस, प्रात्याक्षिकांसह विविध आसने करण्यात आलेत. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध योगासनांमध्ये ‘ओम’कराचा निनान झाला.

खुबचंद सागरमल विद्यालय
खुबचंद सागरमल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शाळेतील विद्यार्थी 608 विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना व्ही.ही.पवार, एस.एस.भालेराव, प्रविण पाटील यांनी मार्गदर्शन केले.

मिल्लत हायस्कूल
मेहरुण येथील मिल्लत हायस्कूल येथे जागतिक योगदिना निमित्त शाळेचे क्रीडाप्रमुख ताजोद्दिन शेख यांनी योगाबाबत मार्गदर्शन केले. तसेच क्रीडाशिक्षक सैयद मुख्तार यांनी विद्यार्थ्यांकडून योग करवून घेतले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच मुख्याध्यापक मुश्ताक शेख, पर्यवेक्षक अब्दुल कय्युम शाह यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अभिनव विद्यालय
माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सरोज तिवारी गाईड कॅप्टन ज्योती पाटील, स्काऊट मास्टर गुरु बारेला, अश्विनी साळुंखे, नीता पाटील, संतोष सपकाळे, क्रीडा शिक्षक विष्णू ठाकरे, कुणाल बडगुजर, भुषण पाठक उपस्थित होते.

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यशस्वीतेसाठी लोक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष विजय कोल्हे, अवधूत पाटील, एस.डी.खडके, मुख्याध्यापिका जे.आर.गोसावी, उपमुख्याध्यापक ए.व्ही.ठोसर, पर्यवेक्षिका बी.डी.अत्तरदे उपस्थित होते.

भाऊसाहेब राऊत विद्यालय
भाऊसाहेब राऊत विद्यालयात तिसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक पी.आर.कोळी, पर्यवेक्षक एल.एस.तायडे, ए.एस.बाविस्कर, व्ही.जे.कोळी, एस.एस.अत्तरदे, पी.बी.मेंढे, एस.डी.राजपूत, आर.ए.कोळी, टी.एन.भोई, वाय.पी.सोनवणे, डी.बी.सोनवणे, एस.आर.शिरसाटे, पी.व्ही.बाविस्कर, व्ही.एन.नारखेडे सहभागी झाले होते. योगसंचलन क्रीडाशिक्षक राजेश जाधव यांनी केले.

सद्गुरु माध्यमिक विद्यालय
मुख्याध्यापिका योगिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन केले. योग दिनानिमित्त पोर्णिमा बाविस्कर, रुपाली बोंडे यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी सुनिल वर्मा यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नानासाहेब आर.बी.पाटील

प्राथमिक विद्यालय
विविध योगाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी करुन योगदिन साजरा केला. याप्रसंगी योगेश पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, प्रतिभा शिवदे, मीरा परदेशी, वंदना नारखेडे, सीमा लढ्ढा, केतकी पाटील, तेजस्विनी वाणी, सुनिल पाटील, संदीप ठोसर आदी उपस्थित होते.

सौ.रत्ना जैन प्राथमिक विद्यालय
दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित प्रतापनगर येथील सौ.रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातर्फे शालेय परिसरात योग दिंडी काढण्यात आली. सुत्रसंचलन तुकाराम पाटील यांनी केले. तर शिवाजी चौधरी यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके करुन दाखविली.

अ‍ॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय
जिमखाना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.वाय.हिवरे, प्रा.आर.पी.सोनवणे, प्रा.गौतम भालेराव उपस्थित होते.

आदर्श विद्यालय
ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवातसी एल.व्ही.राणे यांनी परिचय केला. याप्रसंगी प्राचार्य के.पी.चव्हाण यांच्याहस्ते कातिर्क अट्रावलकर उपस्थित होते.

बालनिकेतन विद्यामंदीर
मुख्याध्यापक शालिनी भंगाळे व ज्येष्ठ शिक्षक डॉ.रविंद्र माळी उपस्थित होते. प्रथम विद्यार्त्यांना योगासने व प्राणायाम यांचे महत्व व जीवनात किती उपयोगाचे असते याबाबत माहिती सांगण्यात आली. यशस्वीतेसाठी राहुल धनगर, श्रीकांत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

आर.आर.विद्यालय
रावसाहबे रुपचंद माध्यमिक विद्यालय व भा.का.लाठी विद्यामंदिर या शाळेत योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्याध्यापिका विजया काबरा, पर्यवेक्षक एस.बी.अत्तरदे, आर.एम.झवर, भा.का.लाठी, विद्यामंदिराचे मुख्याध्यापक गजमल नाईक आदींसह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद उपस्थित होते. आभार क्रिडाशिीक डी.टी.पाटील यांनी मानले.

संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशिय संस्था
संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशिय संस्था, दिव्य अपंग बचतगट जय सद्गुरु वस्ती स्तर संघ, राष्ट्रसेवा फाऊंडेशन, यमुना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा केला. यावेळी आ.राजूमामा भोळे, गायत्री पायील, कविता जाधव, भुषण बाढे, गणेश पाटील, किशोर नेवे, आशा पाटील, मनिषा दळवी, संगीता प्रजापत, इंदीरा भाटी, संजय कासार, दत्तू भदाणे, राजेंद्र वाणी, जितु पाटील, प्रविण पाटील, कल्पना पाटील, कविता मराठे, रमेश सपकाळे, शेख शकील, सिमा खैरनार, संगिता पाटील, आरती पाटील, जितेंद्र पाटील, भटु जोशी, चेतन जाधव, शेख गफूर, जयंत उज्जैनकर, मोहीनी चौधरी, प्रकाश सोनगीरे उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगदिन साजरा


योग मार्गदर्शन केंद्राला प्रारंभ, योग अभ्यासक डॉ.गिरीधर करजगाांवकर यांचे व्याख्यान आणि योग प्रात्यक्षिक अशा विविध कार्यक्रमांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ परिसरात राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांसाठी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात योग शिक्षकांकडून प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, कर्नल दिलीप पांडे, कर्नल अ‍ॅलेक्स् जोसेफ यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारी विद्यापीठाच्या अधिसभागृहात औरंगाबाद येथील योगतज्ज्ञ डॉ.गिरीधर करजगांवकर आणि मु.जे.महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथीच्या विभागप्रमुख प्रा.आरती गोरे यांचे योग विषयक व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी डॉ.करजगांवकर यांनी प्राणायाम संदर्भात तर प्रा.आरती गोरे यांनी योगासनाबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या दोन्ही कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.दिनेश पाटील व विद्यापीठ उपअभियंता राजेश पाटील यांनी केले. योग दिनाचे औचित्य साधून विद्यापीठात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवनात योग मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, डॉ.करजगांवकर, प्रा.आरती गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ला.ना.सार्वजनिक विद्यालय
पर्वतासन, वृक्षासन, मार्जासरासन, नौकासन, हलासन, हास्यासन, व्याघ्रासन आणि प्राणायाम आदी आसने तसेच टाळ्यांचा पाऊस, योग प्रार्थना, योग प्रतिज्ञा, योग मंत्र स्वर्णिमा जोशी आणि कावेरी मराठे या विद्यार्थीनींनी सादर केले आणि विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. याप्रसंगी योग शिक्षिका स्मिता एडके, योगेश सोंजे यांनी प्रात्यक्षिकासह विविध आसने आणि प्रार्थना शिकविल्या.

जाणता राजा प्रतिष्ठान
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुष संचालनालय तसेच मनपा संचलित जाणता राजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन काव्यरत्नावली चौकात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, खा.ए.टी.नाना पाटील, माजी महपौर किशोर पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय योग पटूंनी रिपमिक योगा, अ‍ॅव्हो योगा या प्रकाराचे चित्त थरारक प्रदर्शन सादर केले. यावेळी तनय मल्हारा याने फ्रि-फ्लो डान्स योगाचे प्रात्यक्षिक केले. यावेळी डॉ.अनिता पाटील यांनी योगा विषयावर मार्गदर्शन केले. जाणता राजा ज्ञान व बलसाधना केंद्रात झुंबा, योग कराटे, योग साधना, योग स्टुडीओ, रिदमिक योग, सिल्क हॉट योग साधनेतील निसर्गोपचार उपक्रम सुरु करण्यात आले असल्याचे जाणता राजा प्रतिष्ठानचे किशोर पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी राहुल सुर्यवंशी, श्रीमती मिरा चौधरी, जाणता राजा प्रतिष्ठानच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील, रंजना पाटील, अमरसिंग राजपूत, मनोज पाटील, सौरभ काशिव, योगेश पाटील, वसंत पाटील, शुभम पाटील, देविदास वाणी, हेमराज पाटील, विवेक मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी फाऊंडेशनच्या संस्थांमध्ये योग दिनानिमीत्त प्राणायाम


गोदावरी फाऊंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राणायाम शिबीराद्वारे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमीत्त गोदावरी फाऊंडेशनच्या जळगाव सीबीएसई स्कुल, वैद्यकीय महाविद्यालय, भुसावळ आणि सावदा सीबीएसई स्कुल, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी योग-शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापकांनीही योगासने केली. गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही.जी.अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक, गोदावरी आयएमआरचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस. आर्विकर, रजीष्ट्रार प्रमोद भिरूड, कृषी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, डॉ. एस.एम.पाटील, सीबीएसई स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी, भुसावळ येथील अनघा पाटील, यांनीही योग शिबीरांमध्ये सहभाग घेतला.

विश्व योगदिन समितीतर्फे रॅलीद्वारे जनजागृती


जळगावमधील योगगुरू आणि विवध संस्था एकत्र येवून विश्व योगदिन आयोजन समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षपासून जागतिक योग दिवस साजरा होत आहे. यावर्षी खान्देश सेन्ट्रल मॉल मधून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केशवस्मृती प्रतिष्ठान, पतंजली योग समिती, जाणता राजा प्रतिष्ठान, स्वाभिमान ट्रस्ट, भारत स्वाभिमान केंद्र, बिहार स्कूल ऑफ योग, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, सोहम योग विद्या केंद्र, विश्व मंगल योग निसर्गोपचार केंद्र, आनंद योग सेंटर, आरोग्य भारती इ. संस्थांसह शहरातील योगशिक्षक उपस्थित होते. या रॅलीमध्ये आयुष विभागाच्या जिल्हा समन्वयिका अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी योग सर्वांपर्यंत पोहचावा या हेतूने समितीच्या माध्यमातून सर्व संस्था एकत्र आल्या होत्या.

 

 

LEAVE A REPLY

*