Type to search

जळगाव

आयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद

Share

जळगाव । कोलकत्ता येथे डॉक्टरांना झालेली अमानुष मारहाण, तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आयएमए या संघटनेतर्फे सोमवारी 24 तासाचा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये जळगाव आय.एम.ए. संघटना सहभागी आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. प्रदीप जोशी यांनी दिली. डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांना संरक्षणार्थ कायदे करण्यात यावे, डॉक्टरांवरील हल्ले त्वरित रोखण्यात यावेत, हल्ला करणार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, कोलकत्ता येथील हल्ला झालेल्या डॉक्टरांना न्याय मिळावा, पं. बंगाल सरकारने डॉक्टरांची माफी मागावी अशा आयएमए संघटनेची मागण्या आहेत. बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जळगाव आयएमए संघटनेतर्फे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले आहे.

सोमवार 17 रोजी सकाळी 6 वाजेपासून तर मंगळवार सकाळी 6 पर्यत संप सुरू राहणार आहे. या संप काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
– डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!