या अल्लाह रहेमत की बारीश फरमा दे..!

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-मुस्लिम समाजबांधवांच्या पवित्र सण रमजान ईदनिमित्त इदगाह मैदानावर ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली.
यावेळी जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, विश्वशांती यासह ‘या अल्लाह रहेमत की बारीश फरमा दे’ अशी प्रार्थना करण्यात आली.
शहरातील मुस्लिम कब्रस्थान व इदगाह ट्रस्टच्यावतीने मासुमवाडी व सुप्रिमकॉलनी येथील इदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले.

आज एकाच दिवशी संपर्ण भारतात रमजान ईद साजरी करण्यात आली. मानवजातीवर कृष्पादृष्टी ठेवा, पाऊस दे, विश्वशांती नांदो अशी याचना अल्लाहकडे दोन्ही हात उंचावून मौलाना उस्मान कासमी यांनी केली.

यावेळी मुस्लिम कब्रस्थान व इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष करीम सालार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गफ्फार मलिक, मजिद जकेरीया, अमीन बादलीवाला, प्रा.डॉ. इकबाल शाह, फारुख शेख, ताहेर शेख, सैय्यद चाँद, मुश्ताक शेख, रियाज मिर्झा, सलिम मोहम्मद यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच यावेही जामा मशिदीचे प्रमुख मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज अदा करून दुवा मागितली. यावेळी ईदगाह मैदानावर जवळपास 20 हजार समाजबांधवांच्या उपस्थितीत देशाच्या सुखशांती, एकात्मता आणि विकासासासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पोलिस दलातर्फे पुष्पगुच्छ देवून स्वागत


इदगाह मैदानाबाहेर पोलिस दलातर्फे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, एमआयडीसी पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांनी मौलाना उस्मान कासमी, गफ्फार मलिक, फारुख शेख, करीम सालार, गनी मेमन, ताहेर शेख यांच्यासह समाजबांधवांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.

शिरर्खुम्याची मेजवानी
नमाज पठण झाल्यानंतर शहरातील काही भागात समाजबांधवांनी एकमेकांच्या घरी जावून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला शिरर्खुम्याचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईद साजरी
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रमजान ईद निमित्त इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देवून ईद साजरी करण्यात आली. यावेळी गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप पवार, अ‍ॅड. सचिन पाटील, सलीम ईनामदार, अशफाक बागवान, पराग पाटील, जयप्रकाश महाडीक, डॉ. अनिल पाटील आदी उपस्थित होते.

बचपन प्ले स्कुलमध्ये ईद साजरी
अरुणोदय ज्ञानप्रसारक मंडळातंर्गत बचपन प्ले स्कुल व अकॅडेमिक हाईटस पब्लिक स्कुलमध्ये रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी चिमुकलयांना रमजान महिन्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका आफरीन खान यांच्यासह शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

रोप वाटप


हजरत बिलाल बहुउद्देशिय संस्था, जय अंम्बे टी. स्टॉल व खान्देश एल्गार या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ईद निमित्त रोप वाटप करण्यात आले. यावेळी सैय्यद अकिल पहेलवान, जे.डी.भालेराव, लक्ष्मण पाटील, निलेश बोरा, रवि पाटील, गणेश पाटील महेश पाटील, प्रशांत देशंपाडे, निलेश बारी, नंदकिशोर जाधव, दिनेश खैरनार, भूषण माळी, गणेश सोनवणे, प्रशांत देशपांडे, लक्ष्मण माळी, रशीद बागवान, शेख शकील, अ‍ॅड.सलीम शेख, मयूर वसाणे, इकबाल बाबु, फिरोज पठाण, दीपक बोरसे, गोपाल पाटील, गणेश एस.पाटील उपस्थित होते. अजिंठा चौफुलीजवळील ईदगाह मैदानावरही आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते रोट वाटप करण्यात आले.

सुन्नी ईदगाह ट्रस्ट
देशाची प्रगती, विश्वशांती, अमन और भाईचारा कायम रहे अशी प्रार्थना करीत सुन्नी मुस्लिम बांधवांच्यावतीने ईद-उल-फित्रची नमाज सुप्रिम कॉलनीतील ईदगाह मैदानावर मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या नेतृत्वाखाली अदा करण्यात आली. यावेळी सुन्नी इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक केले. स्व. भवरलाल जैन यांनी संपूर्ण सुन्नी ईदगाह मैदानावर संरक्षक भिंत मोफत करून दिल्याबद्दल समाजबांधवांच्यावतीने जैन इरिगेशन परिवाराचे आभार मानण्यात आले.यावेळी मौलाना नजमुल यांनी नमाजची पध्दत सांगितली. तर मुफ्ती रेहान रजा यासंनी प्रवचन केले. त्यानंतर नमाज अदा करून प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी अयाज अली, मौलाना जाबीर रजा रजवी, मौलाना नजमुल हक, मौलाना मुफ्ती रेहान रजा, मौलाना जुबेर आलम, मौलाना राकीब आलम, मौलाना मतीन रजवी, मौलाना अशरद रजा, मौलाना अलीम रजा, इकबाल वजीर मुख्तार शहा, अब्दुल हमीद, मोईनुद्दीन काकर, जावेद मिस्त्री, शाकीर मेमन यांच्यासह हजारो सुन्नी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*