Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

हतनुरचे दोन तर वाघुरचे संपूर्ण २० दरवाजे उघडले

Share

भुसावळ (प्रतिनिधी) –

तालुक्यातील हतनुर व वाघुर धरणांच्या लाभक्षेत्रात परतीच्या पावसाने थैमान घातला आहे. यामुळे नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आला आहे.

धरणांच्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने हतनुरचे दोन तर पूर्वीच १०० टक्के भरलेल्या वाघुर धरणाची पाणी पातळी धोक्या बाहेर जात असल्यामुळे दि.२७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास धरणाचे संपूर्ण २० दरवाजे उघडण्यात आले आहे. वाघुरचे संपूर्ण २० दरवाजे पहिल्यांदाच उघड्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे तापी व वाघुर नद्यांना मोठा पुर आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!