हरिविठ्ठल नगरातील पार्टीशनच्या घराला आग

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-शहरातील हरिविठ्ठल नगरमधील एका पार्टीशनच्या घराला शॉटसर्कीटमुळे आग लागल्याची घटना आज सकाळी 10.50 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरात संजय सपके यांच्या मालकीचे पार्टीशनचे घर आहे.
त्या घरात मिश्रीलाल सल्या राठोड यांचे कुटुंबिय राहतात. मिश्रीलाल राठोड हे गंवठी काम करीत असल्याने ते पत्नीसह सकाळी 10 वाजता कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते.

दरम्यान त्यांच्या पार्टीशनच्या घरातून धुर निघत असल्याचे काही नागरिकांना दिले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळविली.

घटनास्थळी अग्निशमन विभागाचा एक बंब दाखल झाला होता. आगीत घराच्या अर्ध्याबाजुचे पार्टीशन जळून खाक झाले असून घरातील 450 रुपये रोख, अंथरूण, कपडे जळून खाक झाले आहे.

शॉटसर्कीटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान याबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.

 

LEAVE A REPLY

*