‘अनुभूतींच्या प्रकाशवाटा’ ‘देशदूत’च्या माध्यमातून खुल्या

0
दिंडोरी । दि.29 । विशेष प्रतिनिधी-श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सेवेकर्‍यांना येत असलेले अनुभव ‘देशदूत’च्या माध्यमातून हजारो वाचकांपर्यंत पोहोचत आहेत याचे समाधान आहे, सेवेकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले.
अध्यात्म आणि विज्ञान याचा अनोखा संगम असलेल्या दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सेवेकर्‍यांना आलेले अनुभव ‘देशदूत’मधून ‘अनुभूतींच्या प्रकाशवाटा’ या सदरातून दररोज प्रसिद्ध होत आहेत. गुरुमाऊलींनी ‘देशदूत’मधून प्रसिद्ध होणार्‍या या अनुभूतींचे अवलोकन करुन समाधान व्यक्त केले.

गुरुमाऊली म्हणाले की, ‘देशदूत परिवारा’शी माझे साडेतीन दशकांचे ऋणानुबंध आहेत. सध्या समाजात सैरभैरपणाची स्थिती पहायला मिळते.

ती स्थिर करण्याचे व संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे काम श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.

यात ‘देशदूत’चे नेहमीच सहकार्य मिळते. विविध उपक्रम आम्ही राबवित असतो त्यालाही ‘देशदूत’मधून अग्रक्रम दिला जातो.

सेवामार्गातील सेवेकर्‍यांना अनेक अनुभव येतात. सेवेकर्‍यांच्या ‘अनुभूतींच्या प्रकाशवाटा’ ‘देशदूत’च्या माध्यमातून हजारो वाचकांपर्यंत पोहचत आहे, याचे समाधान आहे.

अनुभव एकाचा असला तरी त्याचा उपयोग अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे हे अनुभव अनेकांना प्रेरक ठरतील. सेवेकर्‍यांनीही याचा लाभ घ्यावा, असे गुरुमाऊली म्हणाले.

बुधवारी चंद्रकांतदादा मोरे जळगावात आले होते, त्यांनीही ‘देशदूत’च्या या उपक्रमाचे कौतूक केले.

 

 

LEAVE A REPLY

*