कृषी सहाय्यकांची माजी मंत्री देवकरांनी घेतली भेट

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनस्थळी माजी कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज भेट दिली.
सुधारित आकृतीबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीत कृषी सहाय्यकांनी देवकरांजवळ आपल्या व्यथा मांडल्या.

यासंदर्भात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी कृषी सहाय्यकांच्या आंदोलनाला पाठींबा देवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

कृषी सहाय्यकांच्या मागण्या या रास्त असल्याचे गुलाबराव देवकर यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

 

LEAVE A REPLY

*