देवकरांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांना साकडे

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-जळगाव ग्रामीण मतदार संघातील विविध कामे व नैसर्गिक आपत्तीबाबत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिलेल्या निवेदनात आसोदा येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकास निधी उपलब्ध करुन द्यावा, धरणगाव येथे बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा तसेच जळगाव व धरणगाव तालुक्यातील दुबार पेरणीकरीता शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी या मागण्यांचा समावेश आहे.

निवेदन देतेवेळी मोहन पाटील, माजी उपसभापती विजय नारखेडे, संतोष आंबटकर, आसोदा येथील सरपंच अरुण कोळी, ग्रा.पं. सदस्य संजय बिर्‍हाडे, हेमंत पाटील, पाथरीचे निलेश पाटील, लिलाधर तायडे, विनोद पाटील, बापू परदेशी, बंटी चव्हाण, मधुकर पाटील, शिवप्रेमी निलेश पाटील, संजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*