जीएसटीविरोधात दालमिल असोसिएशनचा आज बंद

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-ब्रॅण्डेड दाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आलेला आहे. त्या विरोधात जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशनतर्फे उद्या दि.30 रोजी एक दिवस जिल्ह्यातील दालमिल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील 85 दालमिल बंद राहणार आहेत.

केंद्र शासनाने संपूर्ण कर रद्द करुन जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि.1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे.

जीएसटीमध्ये ब्रॅण्डेड दाळींवर 5 टक्के अन्यायकारक कर लावण्यात आला आहे. त्या विरोधात जिल्हा दालमिल ओनर्स असोसिएशनने एक दिवसाचा बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या दि.30 रोजी जळगाव शहरातील 75 आणि अन्य तालुक्यातील 10 असे एकूण जिल्ह्यातील 85 दालमिल एकदिवसीय बंद ठेवण्यात येणार असल्याचे दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*