उत्पन्नात वृद्धी करणारी जीएसटी करप्रणाली – भंडारे

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-देशात जीेएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे.ही करप्रणाली उत्पन्नात वृध्दी करणारी प्रणाली असल्याचे मत राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे यांनी व्यक्त केले.
विक्रीकर भवन कार्यालयाचे वस्तू व सेवाकर भवन नामविस्ताकरप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कर आयुक्त एस.पी.सिंह,राज्यकर उपायुक्त विनोद देवळ्ेकर,विलास तोताडे आदी मान्यवर उपस्थित होते

.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन विक्रीकर भवन कार्यालयाचे वस्तू व सेवाकर असे नामकरण करण्यात आले.

पुढे बोलतांना भंडारे म्हणाले की,देशातील अप्रत्यक्ष करप्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करणारी ही वस्तू व सेवाकर प्रणाली आहे.

ही करप्रणाली उत्पन्नात वृध्दी करणारी आहे.तसेच पारदर्शक करप्रणाली आहे.त्यामुळे करदात्यांनी दडपण घेउ नये.असेही त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*