Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

जळगाव ग्रामीणमध्ये विजयाचा जल्लोष

Share

जळगाव

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात यावेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. भाजपचे बंडखोर उमेदवाराच्या उमेदवारीमुळे युतीच्या अधिकृत उमेदवाराला धक्का बसेल

असे सर्वांना वाटत होते.

बंडखोर उमेदवाराच्या उमेदवारीमुळे ना.गुलाबराव पाटील यांनी याबाबतची तक्रार शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडेही केली होती. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्याशी सुध्दा शाब्दीक वाद झाला होता.

मात्र खान्देशची मुलुखमैदान तोफ समजल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी मोठ्या लिडने आपले मताधिक्य खेचून आणले.

ना.गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा जल्लोष संपूर्ण ग्रामीण मतदार संघात सुरू आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!