Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगाव शहरामध्ये शोभायात्रेद्वारे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्मरण

Share
जळगाव । लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त समस्त लाडवंजारी समाज श्रीराम संस्थेतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ मैदानापासुन ते लाडवंजारी समाज मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शिवतीर्थ मैदानापासुन स्वातंत्र चौक, इच्छादेवी चौफुली मार्गे लाडवंजारी समाज मंदिरात शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेत बॅण्ड पथक,

ढोल-ताशेंसह विद्यार्थीनींचे लेझीम पथक होते. शोभायात्रेत सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासह नगरसेवक प्रशांत नाईक यांनी ढोल-ताशाच्या गजरावर ठेका धरला होता. शोभायात्रेत वरणगावचे नगराध्यक्ष सुनिल काळे, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, महापौर सीमा भोळे, नगरसेवक नितीन लढ्ढा,

विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, शरद तायडे, सुनिल महाजन, प्रशांत नाईक, राजेंद्र घुगे पाटील, अशोक लाडवंजारी, ज्ञानेश्वर नाईक, विजय पाटील, प्रविण सानप, कृष्णा पाटील, योगेश घुगे, पिंटु सांगळे,

समाधान थाटे, नंदु वंजारी, किरण वाघ, अनिल घुगे, चेतन सानप, रामभाऊ पाटील, सचिन ईखे, विनय ढाकणे, गोविंदा सांगळे, तेजस वाघ, शुभम वाघ, समाधान देशमुख, गोलु वंजारी आदी समाजबांधव उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!