गोलाणीत स्वच्छता होत नसल्याने व्यापार्‍यांची नाराजी

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – गोलाणी व्यापारी संकुलातील अनेक समस्यांच्या मागण्यांसाठी व्यापारी शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांनी महापौर नितीन लढ्ढा यांची भेट घेवून चर्चा केली.
दरम्यान, स्वच्छता केली जाईल. तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च व्यापार्‍यांनी केल्यास संकुलातील पाचही लिफ्ट सुरु करण्याचे आश्वासन महापौर नितीन लढ्ढा यांनी दिले.

महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली गोलाणी व्यापारी संकुलातील व्यापार्‍यांची बैठक झाली. यावेळी पुरुषोत्तम टावरी, सुनील पंजवानी, घमंडीराम सोनी, महेश सोनी, शिरीष शेळके, महेश भंगाळे, नगराज पाटील, रामजी सुर्यवंशी, सुभाष कासट, संजय बोंडे यांच्यासह मनपा भाजपा गटनेते सुनील माळी, नगरसेवक सुनील महाजन, अमर जैन, श्यामकांत सोनवणे, अजय पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील उपस्थित होते.

गोलाणी व्यापारी संकुलात साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे साफसफाई करावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली.

यावर महापौर नितीन लढ्ढा यांनी संकुलातील साफसफाई व्यापार्‍यांनीच करावी, अशी भूमिका विषद केली. मात्र त्यानंतर पार्किंगची साफसफाई आणि आठवड्यातून एक दिवस पोर्चमधील साफसफाई केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.

गोलाणी व्यापारी संकुलातील चौथ्या मजल्यावर येतानां ग्राहकांना त्रास होत असल्याने लिफ्ट सुरु करण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली.

यावर महापौर नितीन लढ्ढा यांनी देखभाल दुरुस्तीचा खर्च व्यापार्‍यांनी केल्यास लिफ्ट सुरु करण्यास सकारात्मकता दर्शविली. दरम्यान, गोलाणी संकुलातील विविध समस्यांबाबत व्यापार्‍यांनी आपली कैफीयत मांडली.

 

LEAVE A REPLY

*