गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकान फोडले

0
जळगाव । शहरातील गोलाणी मार्केटमधील ग्राऊंड फ्लोअरवरील मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 14 मोबाईल चोरून नेल्याची घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान चोरटा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून चोरट्यांनी मार्केटमधील अन्य दोन दुकाने देखील फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अयोध्या नगरातील रहिवाशी असलेले राजकुमार विजय महाजन यांचे गोलाणी मार्केटमधील ग्राऊंड फ्लोअरला माऊली मोबाईल अ‍ॅण्ड अ‍ॅसेसरीज नावाने दुकान आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे 8.30 वाजेच्यासुमारास महाजन यांनी दुकान बंद केले होते. त्यानंतर रात्री 12.41 मिनीटांनी दोन चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरटयाने 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 14 वेगवेगळया कंपनीचे मोबाईल चोरून नेले. त्यानंतर चोरटा 12.44 मिनीटांनी दुकानाच्या बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. दरम्यान पहाटे 4 वाजेच्या सुमारास गुरख्याला माऊली मोबाईलच्या दुकानाचे दोन्ही कुलूप तुटलेले दिसले. दुकानावरील फोन नंबरवरून गुराख्याने दुकानात चोरी झाल्याची माहिती महाजन यांना दिली.

श्वान व ठस्से तज्ञांनी घेतले नमुने
दुकानमालक महाजन यांनी दुकानवर आल्यानंतर लगेचच शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच त्यानंतर श्वान पथक व ठस्से तज्ज्ञ दाखल झाले. त्यानंतर श्वानाने दुसर्‍या दुकानापर्यंत रस्ता दाखविला. तर ठस्से तज्ज्ञांनी याठिकाणचे नमुने घेतले आहे.

चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
माऊली दुकानाचे कुलूप तोडल्यानंतर एक चोरटा बाहेर तर दुसरा चोरटा रात्री 12.40 वाजता दुकानात शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर 12.44 वाजता हा चोरटा 14 मोबाईलचे खोके घेवून बाहेर पडतांना फुटेजमध्ये कैद झाला आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयिताचा शोध सुरु आहे. याबाबत राजकुमार महाजन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न
चोरट्यांनी माऊली मोबाईल दुकान फोडल्यानंतर काही अंतरावर असलेल्या एक ओंकार मोबाईल दुकानाचे देखील दोन्ही कुलूप तोडले. परंतू या दुकानाचे सेंटल लॉक व पट्टी लॉक न उघडल्याने चोरट्यांना या दुकानात प्रवेश करता आला नाही. तसेच चोरट्यांनी आणखी एक दुकानाचे कुलूप तोडले होते.

LEAVE A REPLY

*