Type to search

maharashtra जळगाव

गोलाणी व्यापारी संकुलाच्या चौथ्या मजल्यावर आग

Share
जळगाव । गोलाणी व्यापार संकुलातील चौथ्या मजल्यावरील वापरत नसलेल्या एका हॉलमध्ये असलेल्या कचर्‍याला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. या आगीच्या घटनेमुळे नागरिकांची धावपळ झाली होती. आगीचे ठिकाण चौथ्या मजल्यावर असल्याने सुरुवातीला आग विझविण्यासाठी अडचणी आल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

गोलाणी व्यापारी संकुलाच्या चौथ्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. तृतीयपंथीयांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे पथक याठिकाणी दाखल झाले. संकुलात अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात जलवाहिनी, पाणी व अन्य साहित्य नसल्याने व ते वापरात नसल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!