Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव : गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

Share

जळगाव (प्रतिनिधी)-

जिळगाव जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेले गिरणा धरण 90 टक्के भरले आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस सुरु आहे, त्यामुळे धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता असल्याची माहिती कार्यकारी अभियंता धमेंद्रकुमार बेहेरे यांनी दिली.

धरणाचे दरवाजे उघडणार असल्याने गिरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गिरणा धरणाचे बांधकाम झाल्यापासून धरण केवळ नऊ वेळाच १०० टक्के भरले आहे. यापूर्वी २००६ मध्ये धरण १०० टक्के भरले होते.

सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या गावांना दिला असून यात प्राणहानी होणार नाही, तसे आदेश तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच याना कळविले असल्याचे धर्मेंद्रकुमार बेहेरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग यांनी माहिती दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!