Type to search

Breaking News जळगाव राजकीय

जळगाव घरकुल घोटाळा : जामीन अर्जावर एक ऑक्टोंबरला सुनावणी

Share

जळगाव –

जळगाव घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या आरोपींच्या जामिन अर्जावर आज दि.२६ रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना पुन्हा जामीन अर्जावरील सुनावणी लांबली असून ती आता दि.१ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, चोपड्याचे आ.चंद्रकांत सोनवणे यांचेसह आजी-माजी नगरसेवक अडकले असून या सर्वांना धुळे न्यायालयात न्या.सृष्टी निळकंठ यांनी निकाल देत त्यांना सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे.

त्यामुळे यातील काही आरोपींनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. घरकुल घोटाळ्याचा निकाल लागल्या नंतर या प्रकरणातील विशेष सरकारी वकील अमोल सावंत यांनी नुकताच राजीनामा दिल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण येऊ लागले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!