Type to search

गिरणेतून आवर्तन सुटले!

maharashtra जळगाव

गिरणेतून आवर्तन सुटले!

Share
चाळीसगाव । गिरणा धरणातून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शुक्रवारी सकाळी पिण्याच्या पाण्यासाठी 2000 क्युसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. तब्बल 12 तासानंतर गिरणा धरणाचे पाणी तालुक्यातील पिलखोड येथे सायंकाळी 7 वाजेदरम्यान पोहचले पाणी पाहताच ग्रामस्थांच्या समाधान लाभले असून तूर्त तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्याची तहान भागविणार्‍या गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाचोरा व भडगाव पालिकांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शुक्रवारी 2000 क्सुसेस पाणी सकाळी सोडण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून भडगाव व पाचोरा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. हे आवर्तन सुटल्याने पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तूर्त गिरणा परिसरात सुटला आहे. सदर पाणी आठ ते दहा दिवस आवर्तन राहणार आहे. दहिगाव व कानळदा बंधार्‍यापर्यंत पाणी पोहोचणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या आवर्तनाने परिसरातील नागरिकांची समस्या दूर होणार असून तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!