गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

0
जळगाव । शहरात दि. 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून या कालावधीत शहरातील विविध सार्वजनिक गणेशमंडळांतर्फे करण्यात येणारे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. तसेच स्थापनादिनी व विसर्जन मिरवणूकांसाठी देखील गर्दी होणार असल्याने शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांनी दिले आहे.

सुभाष चौक ते रथ चौक, रथ चौक ते बोहरा चौक, रथ चौक ते पांझरापोळ चौक, पिपल्स बँक ते दाणाबाजार चौक ते सुभाष चौक या चारही मार्गावर तसेच सरस्वती डेअरी ते राजकोटीया ण्ड कंपनी दुकान, मद्रास बेकरी ते देना बँक, युनियन बँक ते दीप फार्मसी मेडीकल, अनिल प्रोव्हिजन ते राठी ट्रेडर्स या मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आरास पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी दि. 13 सप्टेंबर ते दि. 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये सायंकाळी 6 ते मध्यरात्री पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

त्याचबरोबर जळगाव शहरातील प्रमुख सार्वजनिक श्री. गणेश विसर्जन रविवार 23 सप्टेंबर असल्याने शहरात श्री. गणेश विसर्जन मिरवणूका असल्याने या मिरवणुका 23 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मध्यरात्री पर्यंत ला. ना. चौक, सेशन कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरु चौक, म.न.पा. इमारती समोरील चौक, जयप्रकाश नारायण चौक, शास्त्री टॉवर चौक, साने गुरुजी चौक, घाणेकर चौक, भिलपूरा चौक, बालाजी मंदिर, रथ चौक, सराफ बाजार, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, बेंडाळे चौक या मार्गाने विसर्जनासाठी मिरवणूकीने जातील. त्यामुळे विसर्जन मिरवणूक मार्ग व मार्गास मिळणारे सर्व उपरस्ते व गल्ल्यांमधून येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) प्रवेश बंद करण्यात आला आहे.

असोदा भादली कडून जळगावकडे येणार्‍या व जाणार्‍या एस. टी. बसेस व इतर सर्व वाहने गुरुवार 13 सप्टेंबर ते रविवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते मध्यरात्री पावेतो या कालावधीत मोहन टॉकीज-गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, लक्ष्मी नगर, कालीका माता मंदिर मार्गे महामार्गावरुन अजिंठा चौक- आकाशवाणी चौक, नवीन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करतील.

चोपडा यावल- विदगाव- शिवाजी नगर कडून मिरवणुक मार्गाकडे येणारी वाहने दि. 23 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर पुलामार्ग न येता शिवाजी नगर दुध फेडरेशन- जुनी जैन फॅक्टरी गुजराल पेट्रोल पंप महामार्गावरुन आकाशवाणी चौक नवीन बस स्टॅण्ड या मार्गे जातील व येतील असेही श्री. शिंदे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*