Type to search

जळगाव

‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी

Share

जळगाव । ग.स.सोसायटीमध्ये 50 लाख रुपये ठेवीसंदर्भात आरोप करण्यात आलेला आहे. त्यात किरण भिमराव पाटील यांच्या नावाने जी ठेव ठेवण्यात आलेली होती त्याबाबत संस्थेने चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केलेली आहे. सदरचा व्यवहार हा नोटबंदी पुर्वीच्या कालखंडातील आहे. याबाबत सहकार खात्याने चौकशी करुन अहवाल संबंधितांना दिलेला आहे. त्या 50 लाखाच्या ठेवी संदर्भात विरोधकांना पूर्ण जाणीव असतांना सुद्धा त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे व उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन संस्थेच्या संचालक मंडळ व सभासदांची समाजात मानहाणी केली आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात सर्वसाधरणसभेत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गटनेते तुकाराम बोरोले व ग.स.चे अध्यक्ष मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपाध्यक्ष शामकांत भदाणे, संचालक विलास नेरकर, नथ्थू पाटील, सुनील निंबा पाटील, सुनील अमृत पाटील, अनिल गायकवाड पाटील, विश्वास सूर्यवंशी, यशवंत सपकाळे, सुभाष जाधव, तज्ञसंचालक संजय पाटील, दिलीप चांगरे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, सन 2012 ते 2017 या कालावधीमध्ये बनावट खाते उघडून 3 ते 4 कोटींची बेनामी संपत्तीसंदर्भात आरोप झाले असून त्या आरोपात तथ्य नाही. शासकीय लेखापरीक्षण झालेले असून त्या अहवालात कुठलाही आक्षेप नोंदविला नाही. संस्था फक्त सभासद नाम मात्र सभासद यांच्याच ठेवी स्विकारते,असेही त्यांनी सांगितले. अमळनेर येथील जुनी इमारत विक्रीबाबत रितसर प्रक्रिया करुन परवानगी घेवून टेंडर प्रक्रिया राबवून विक्री केली. विरोधकांचा आरोप हा बिनबुडाचा आहे. तसेच नोकर भरतीही सर्वसाधरण सभेची मंजुरी घेवूनच केलेली आहे. विरोधकांनी सुप्रिम कोर्ट याचिका दाखल केली होती. ती कोर्टाने फेटाळली आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग.स.सोसायटीच्या सर्व शाखा ऑनलाईन करणार!
ग.स.सोसायटीमध्ये सभासद संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. आकर्षक व्याजदर ठेवण्यात येणार असून सभासदांच्या हितासाठी कल्याणकारी धोरण राबविण्यावर भर राहील. तसेच अपंग सभासदांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे, ग.स.सोसायटीच्या जिल्ह्यातील सर्व शाखा संगणकीकृत ऑनलाईन व्यवहार करण्यात येईल, असेही ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी यावेळी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!