Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव महात्मा फुले मार्केट गाळे सीलप्रकरण : गाळेधारकांकडून उपायुक्तांना कोंडण्याचा प्रयत्न

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

मनपाच्या व्यापारी संकुल किरकोळ वसुली विभाग, अतिक्रमण विभागाचे कर्मचार्‍यांनी सेंट्रल फुले, महात्मा फुले मार्केटमधील गाळा क्र. ११५, ११६, ११७ ही तीन गाळे सील केली.

गाळा क्र. ५, गाळा क्र.४८ हे गाळे सील करतांना संबंधित मालक गाळेधारकांसह इतर गाळेधारकांनी शासकीय कामात अडथळा आणला, तसेच अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर तीन वेळेस गाळामधील वीज बंद करुन धाकदपटशा, शिवीगाळ करुन कोंडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने महसूल उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुटे यांनी आपल्या सहकार्‍यांसह शहर पोलिस स्टेशन गाठून या गाळेधारकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याचे काम ४ वाजेपर्यंत सुरूच होते. दरम्यान यावेळी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित गाळेधारक महेंद्र नाथाणी, भूषण नाथाणी यांनीही उपायुक्तांसह मनपावरही गुन्हा दाखल केला आहे.

मनपा उपायुक्त यांनी आपल्या २० ते २२ कर्मचार्‍यांसह दुकानात बळजबरीने घुसून कर्मचार्‍यांना बाहेर काढले, मनमानी केली अशा आशयाची तक्रार दाखल केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!