Type to search

Featured

जळगाव : विवेकानंद शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Share

जळगाव (प्रतिनिधी) – 

आय.एम.ए. जळगावची मिशन पिंक हेल्थ शाखा तसेच विजयेंद्र फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. १८ फेब्रुवारी रोजी विवेकानंद शाळा वाघ नगर शाळा येथे विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे ७२० मुलामुलींची तपासणी करण्यात आली.

शिबीरात आधी  डॉ. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांची  हिमोग्लोबिन तपासणी केली. शिबीरात फिजीशीयन डॉ. पराग चौधरी, डॉ. नेहा भंगाळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. जयंती पराग चौधरी,  डॉ. मनजीत संघवी, आणि डॉ. प्रियंका चौधरी तसेच डॉ. नितीन धांडे अस्थीरोग तज्ञ यांनी आणि  बालरोग तज्ञ डॉ. गौरव महाजन, डॉ. सारिका पाटील, डॉ. मृणालिनी पाटील, डॉ. आरती पाटील.  नेफ्रालॉजिस्ट डॉ. अमित भंगाळे, युरोसर्जन डॉ. नीरज चौधरी यांनी विशेष तपासणी केली.

सोबतच दंतवैद्यक  डॉ. सागर चौधरी, डॉ. वेणुका चौधरी आणि डॉ. मेघना नारखेडे यांनी दातांची तपासणी केली आणि रोज दोन वेळा नियमीतपणे दांत साफ करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सागर चौधरींतर्फे गरजू मुलांना टुथपेस्ट देण्यात आल्या.

 विजयेंद्र फाउंडेशनतर्फे गरजू मुलांना औषधे वितरीत

ॲनिमीया असणाऱ्या मुलांना विजयेंद्र फाउंडेशन तर्फे रक्तवाढीची औषधे, जंत निर्मुलनाच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या वितरीत केल्या. गरजू मुलांना साबणे देण्यात आली. डॉ. जयंती चौधरी यांनी आहारात रोज एक वाटी कोणत्याही कडधान्याची उसळ, रोज एक  उपलब्धफळ, सॅलेड, २ खजुर यांचा समावेश असावा तसेच मुलांनी जेवणाआधी आणि बाथरूम ला गेल्यावर हात धुवावे असे सांगितले.

अतुल पाटील आणि हेमंत वाणी यांनी औषधे वितरीत करण्यास अनमोल सहकार्य केले . शिक्षिकांनी शाळेतील मुले ‘द डेली माईल’ अंतर्गत रोज १५ मिनिटे रोज धावतील तसेच मुलांनी २ झाडे लावून त्यांचे संगोपन करतील, मोबाईल खेळण्यापेक्षा अवांतर पुस्तके वाचतील असे आश्वासन दिले.

शिबीराच्या आयोजनास आय.एम.ए. सेक्रेटरी डॉ. धर्मेन्द्र पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, शिक्षक मुकुंद शिरसाठ, गणेश लोखंडे आणि विजयेंद्र हॉस्पिटलचे किरण चौधरींसोबत सुरेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!