ओक मंगल कार्यालयाच्या खोलीला आग

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयाच्या एका खोलीला आग लागल्याची घटना रात्री 8.40 वाजेच्या सुमारास घडली.
या आगीत 15 ते 20 हजारांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, बळीराम पेठेत नितीन ओक यांच्या मालकीचे ओक मल्टिपर्पज हॉल आहे.
या हॉलच्या बाजुच्या गल्लीत कार्यक्रम असल्याने गल्लीत काही तरुणांनी या ठिकाणी फटाके फोडले. दरम्यान फटक्याची चंगी उडल्याने मंगल कार्यालयाच्या एका खोलीला आग लागली.

या खोलीत मंगल कार्यालयाच्या जुन्या लाकडी फ्रेम असल्याने आगीने रौदरुप धारण केले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली.

यावेळी नगरसेवक जितू मुदंडा यांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. काही वेळात अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी घटनास्थळी शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. यावेळी परिसरात नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.

40 मिनीटानंतर आग आटोक्यात
ओक मल्टिपर्पज हॉलचे मालक नितीन ओक यांनी गल्लीत काही तरुण फटाके फोडत असल्यानेच आग लागली असल्याचे सांगितले.

आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान 40 मिनीटांनी आग विझविण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

अंदाजे 20 हजाराचे नुकसान
आगीत त्या खोलीतील लाकडी फ्रेम व दरवाजा जळून खाक झाला असून या आगीत अंदाजे 15 ते 20 हजारांचे नुकसान झाले असल्याचे ओक यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*