Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा प्रयत्न विफल!

Share
मनोहर कांडेकर
चाळीसगाव । आई वडील विभक्त झाल्यामुळे त्यांच्या मुलांवर काय दुष्परिणाम होतात याचा प्रत्यय चाळीसगावात आला आहे. शहरातील इयत्ता 9 वी शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दारुड्या बाप्पाने चक्क 34 ते 35वर्षीय तरुणाशी विवाह ठरवला. परंतू मुलीच्या जागृतेमुले व मावशीच्या धिरामुळे मुलीने चक्क आज पोलीस स्टेशन गाठले आहे. अल्पवयीन या नाजुक कळीला वयात येण्याआधिच खुडण्याचा प्रयत्न झाला.

आता मात्र पोलीस काय भूमीका घेता याकडे सर्वांचे लक्ष लागल असून अल्पवयीन मुलीच्या गळ्यात लग्नाची बेडी घालणार्‍या पोरीच्या बापाच्या हातात पोलीस बेडी ठोकतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरातील वामन नगर येथे राहणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातील एका शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत आहे. वडीलाना दारुचे वेसन असल्यामुळे मुलीची आई जवळपास 12 ते 13 वर्षांपूर्वीच मुलीला सोडून सुरत येथील बारडोली येथे आईकडे राहते. तर अल्पवयीन मुलगी लहानपणापासूनच वडील व आजी सोबत चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे. आजकाल लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे, मुलाकडील मंडळी स्वता; सर्व खर्च करुन घेतात.

वरतून मुलीच्या बापाला पैसेही देतात. असाच काहीसा प्रकार या अल्पवयीन मुलीसोबत घडला. दारुड्या बापाने मुलीच्या इच्छेविररुद्ध तिच्या पेक्षा दुप्पट वयाने मोठा असलेल्या जळगाव येथील 34 ते 35 वयाच्या मुलाशी तिचा विवाह ठरवला, आणि मुलीला न विचारता लग्न पत्रिका, बस्ता सर्व काही झाले. येत्या 23 जानेवारील मुलीचा विवाह जळगाव येथे होणार आहे. मुलाकडील मंडळील संपूर्ण खर्च करण्याची तयारी दाखवल्यामुळे, दारुड्याबापाने अल्पवयीन पोटाच्या पोरीला तिच्या पेक्षा कितीतरी पटीने मोठा असलेल्या मुलासोबत तिचा विवाह लावून देण्यासाठी सर्व तयारी केली आहे.

मुलीच्या हिम्मतीमुळे प्रकार उघडकीस- अल्पवयीन मुलीच्या कवळ्या मनाला तिच्या सोबत घडलेला प्रकार सहन होत नव्हाता. परंतू दारुड्या बापाच्या भितीने ती गोष्ट कुठीही सांगू शकत नव्हती. परंतू ती हिम्मत करुन, तालुक्यतील उबरखेड येथे राहणार्‍या तिच्या मावशीकडे ती गेली व तीन घडलेला सर्व प्रकार मावशीला सांगीतला. मावशीने त्वरित बारडोली येथील तिच्या आईच्या कानावर मुलीच्या लग्नाबाबतची माहिती दिली. मुलीच्या आईने काही नातेवाईकांनी व मुलीलासोबत घेत, गुरुवारी संकाळी पोलीस स्टेशनला धाव घेतली, आणि मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत आपबिती पोलिसांसामोर मांडली. यावेळी अल्पवयीन मुलीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.

मुलीच्या कथा ऐकून उपस्थितांचे देखील डोळे पानवले होते. मुलीचे जे वय शिक्षणाचे व खेळण्याचे आहे, त्याच वयातच तिच्या गळ्यात लग्नाची बेडी अडकवणार्‍या दारुड्या बाबाच्या हातात बेडी ठोकण्यासाठी पोलीस सज्ज झाले असून दारुड्या बापाचा शोध घेत असून गुन्हां दाखल करण्याची प्रक्रियेबाबत विचार करीत आहेत. तालुक्यात आशा अनेक कळण्या उमळण्याआधीच खुडण्याची पथा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. सद्या लग्नसराई चालू आहे, खेड्यात अनेक अल्पवयीन मुलीची लग्ने लावली जातात. आता गरज आहे. ती सेवाभावी संस्था व पोलिसांच्या करड्या नजरेची !

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!