जिल्ह्यातील 68 हजार 386 शेतकर्‍यांचा 190 कोटीचा विमा

0
जळगाव । दि.31। प्रतिनिधी-प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 68 हजार 386 शेतकर्‍यांचा 190 कोटी रूपयांचा विमा उतरविण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.
प्रधानमंत्री पिक विम्याचा लाभ घेण्यासाठी आज अंतीम मुदत होती. जिल्ह्यातील 11 राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याठिकाणी शेतकर्‍यांचे पिक विम्याचे अर्ज स्विकारण्यात आले.

यात एकट्या जिल्हा बँकेने 58 हजार 96 शेतकर्‍यांचा 156 कोटी 86 लाख 8 हजार 917 रूपयांचा विमा उतरविला आहे. तर इतर राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 10 हजार 298 शेतकर्‍यांचा विमा उतरविला आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेला यंदा फारसा प्रतिसाद दिला नाही.

मुदतवाढीची अपेक्षा
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत पात्र शेतकर्‍यांचा समावेश करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. अद्याप त्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी बँकासमोर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचसोबत कर्जमाफीचे अर्जही स्विकारण्यात सुरु असल्याने शेतकर्‍यांची मोठ्या ओढताण होतांना दिसली.

 

LEAVE A REPLY

*