शाश्वत शेतीच्या आधारेच यशाचा मार्ग

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीचे शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिकतेची कास धरुन शाश्वत शेतीकडे वळल्यास शेती क्षेत्रातही निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे केले.
हरित क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्ममाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषेदच्या अध्यक्षा उज्वला पाटील या होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जळगाव पंचायत समितीच्या सभापती यमुनाबाई रोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्याला शेती क्षेत्राचा मोठा वारसा आहे. केळी, भरीताचे वांगे यांचे मार्केटींग होणे आवश्यक आहे. यासाठी कृषि पर्यटन संस्कृती रुजविणे आवश्यक आहे, असे सांगून शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्ह्यातील शेतकरी विश्वासराव पाटील, प्रेमानंद महाजन, रविंद्र पाटील, नारायण चौधरी यांना राज्य शासनाचे कृषि पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.

सुत्रसंचालन जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी मधुकर चौधरी यांनी तर आभार रविंद्र पाटील यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*