Type to search

जळगाव

पद्मालय-एरंडोल रस्त्यावर रिक्षा उलटल्याने एकाचा मृत्यू; दोन महिला गंभीर

Share

एरंडोल । भरधाव वेगाने येणारे रिक्षा उलटल्याने  झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 11  रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पद्मालय -एरंडोल रस्त्यावर घडली असून जखमी महिलांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

एरंडोल येथील महाजन कुटुंबीय हे ऑटो रिक्षा करून पद्मालय येथे सोमवारी गणपती दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असतांना भरधाव वेगाने येणारी रिक्षा घाटापासून थोड्या अंतरावर असलेल्या वळणावर  चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे उलटली. या दुर्घटनेत रिक्षामधील असलेले दशरथ अर्जुन महाजन (वय 65) रा.मसावद नाका एरंडोल हे जागीच ठार झाले तर विद्या सुनील माळी (वय 35) या महिलेचा पाय फॅक्चर झाला आहे.  शितल श्रीकृष्ण कासार (वय 23) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहीकेने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!