Type to search

जळगाव

पद्मालयहून परतणार्‍या भाविकांच्या वाहनाला अपघात; 30 जखमी

Share

एरंडोल । श्रावण सोमवार व संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र पद्मालय येथे भरलेल्या यात्रेनिमित्त विघ्नहर्त्या गणेशाचे दर्शन करून सोनबर्डी येथे परत जाणारे भाविकांचे ट्रॅक्टर व एरंडोलकडून पद्मालयकडे जाणारी पियॅजिओ रिक्षा (क्र.एम.एच.19-व्ही. 7263) या दोन्ही वाहनांमध्ये बूमटे शेतानजीक वळणावर दुपारी 3.10 वाजता अपघात होऊन 30 भाविक जखमी झाले. पैकी आठ गंभीर जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करून जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील काही भाविक बेशुद्धावस्थेत तर काही जखमी अवस्थेत परिसरात फेकले गेल्यामुळे त्यांचे आप्तेष्ट आक्रोश करीत त्यांना शोधत होते. उपस्थित सर्वच जण मदतीसाठी आरोळ्या मारीत होते. तसेच ट्रॅक्टर ट्राली मधील शेगडी, सिलिंडर, भांडे, पाण्याचा कॅन आदी वस्त पसरल्या होत्या. बहुतांश जखमी हे सोनबर्डीचे आहेत. घटनेचे वृत्त कळताच गावकर्‍यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

दरवर्षी श्रावण सोमवारी श्री क्षेत्र पद्मालय येथे यात्रोत्सव आयोजित केला जातो. यानिमित्त सोनबर्डी येथील भाविकांची दिंडी पद्मालय येथे गेली असता त्या ठिकाणी देवदर्शन आटोपल्या नंतर भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर घराकडे ट्रॅक्टरने परत जात असतांना पद्मालयपासुन सुमारे सहा किलो मीटर अंतरावरील वळणावर एरंडोल कडून पियॅजिओ रिक्षा (क्र.एम.एच.19-व्ही. 7263) येत होती. या दोन्ही वाहनांमध्ये अपघात होऊन ट्रॅक्टरची ट्राली रिक्षावर उलटली. त्यात जवळपास 30 भाविक जखमी झाली.

जखमी-सुरेखा नितीन पाटील (28),मंगल विकास पाटील(10),जिजाबाई सुभाष पाटील (65),निलेश धर्मा पाटील (वय16),निलेश भरत पाटील (15), सपना राजेंद्र कसारे (17), अविनाश बालू शिंदे (16), चेतन विनोद पाटील (10), भरत लोखंडे (45), उषाबाई लोखंडे (वय43), मालुबाई बुधा पाटील (60), कावेरी ज्ञानेश्वर पाटील (7), गायत्री ज्ञानेश्वर पाटील (9),अजय भरत लोखंडे (14), दीक्षा दिपक पाटील (18), शालिक वामन पाटील (68), किरण संतोष पाटील (16), रमाकांत पाटील (19), अनिल श्रीराम मोरे (22), निखील प्रविण पाटील (16), प्रविण पाटील (22),अक्षय शिंदे (20), रिक्षा चालक सुरेश वंजारी (49) रा. एरंडोल, राजेंद्र पाटील (वय 52) सर्व राहणार सोनबर्डी.

घटनास्थळी मदत कार्य
आ.डॉ.सतीष पाटील यांचे स्वीय सहाय्यक दत्तु पाटील, विकास साळुंके, विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, प्रा.मनोज पाटील, एन.डी.पाटील, रामधन पाटील व कार्यकर्त्यांनी जखमींना मिळेल त्या वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. डॉ.राजेंद्र देसले, डॉ.राहुल वाघ, डॉ.किरण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पाटील यांंनी वैद्यकीय उपचार केला. तसेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयाला 108 ची सुविधा बंद असल्याने आ.डॉ.सतीष पाटील यांनी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधुन जळगाव, धरणगाव, कासोदा, पाळधी व पारोळा येथील 108 ची सुविधा उपलब्ध करून दिली व त्यांनी जखमींची विचारपुस केली. दरम्यान माजी आ. चिमणराव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर व राजेंद्र चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, चिंतामण पाटील, सुनिल चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली व त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांना सुचना दिल्या. यावेळी एरंडोल उमरदे परिसरातील ग्रामस्थ व पद्मालयकडुन येणारे भाविभक्तांनी अपघातस्थळी धाव घेवुन मदत केली.

दरम्यान रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातातील उषाबाई भारत लोखंडे वय 40, शालिक वामन पाटील वय 69, अजय भारत लोखंडे वय 17, सपना बाळू शिंदे वय 15, प्रतिक्षा भिकन पाटील वय 18 या पाचही जखमींना उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी असलेल्यांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!