Type to search

Breaking News ई-पेपर जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १३ उमेदवारांना नोटीस,तर सीव्हीजीलवर २८ तक्रारी दाखल

Share

जळगाव – राज्यासह जिल्हाभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९साठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक प्रचारासाठी आवश्यक त्या परवानग्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून न घेतल्याच्या  कारणावरून जिल्हयातील ११ विधानसभा मतदार संघातील १३ उमेदवारांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नोटीस बजावल्या  तर सीव्हीजील ऍपवर २८ तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

यात अनिल छबीलदास चौधरी, हरि माधव जावळे, सुनिल दादा सुरवाडे, जगन देवराम सोनवणे, अनिल भाईदास पाटील, मंगेश रमेश चव्हाण, संजय भास्करराव गरूड, किशोर धनसिंग पाटील, दिलीप ओंकार वाघ, अमोल पंडीतराव शिंदे, चंद्रकांत जामसिंग बारेला, रोहिणी एकनाथराव खडसे या १३ विधानसभा निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना व्हॉटसऍप वर आलेल्या तक्रारीसंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर सीव्हीजील ऍपवर आतापर्यत २८ तक्रारी ऑनलाईन दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!