Type to search

maharashtra जळगाव राजकीय

किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान

Share
जळगाव । जिल्हयातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजेपासून सुरूवात झाली. शहरात सकाळी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. दुपारी उन्हामुळे मतदान केंद्रांवर अल्प प्रमाणात गर्दी दिसून आली. तर सायंकाळी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. शहरात किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

शहराच्या प्रथम नागरिक महापौर सीमा भोळे यांच्यासह आ.राजुमामा भोळे यांनी सकाळी 7.15 वाजता महाराणा प्रताप शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.जळगाव नगरीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी गेंदालाल मिल परीसरातील उर्दू शाळेत पत्नी रत्नाभाभी जैन, मुलगा राजेश जैन यांच्यासह परिवारातील सदस्यांनी सकाळी 8.20 वाजता मतदानाचा हक्क बजावला. भल्याभल्यांना घाम फोडणारे विशेष सरकारी वकील पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सकाळी 10.10 वाजता भोईटे शाळेत मतदान केले.

जैन इरिगेरशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी 10.00 वाजता तर विधानपरीषद सदस्य आ. चंदूलाल पटेल यांनी 10.25 वाजता मतदान केले. शहरातील शनीपेठ, कांचननगर या भागातील मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून तुरळक गर्दी दिसून आली. तर तांबापुरा, उर्दू शाळा क्रं.4, विद्या इंग्लीश मीडियम स्कूल यासह संमिश्र वस्ती भागातील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. मतदान केंद्राबाहेर देखील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मांदीयाळी दिसून आली. मतदानाचा फिव्हर सोशल मीडियावर देखील मोठया प्रमाणावर दिसून आला आहे. अनेकांनी मतदान केंद्रातून मतदान केल्यानंतर बाहेर आल्यावर बोटाला लावलेली शाईचे सेल्फी काढून ते सोशल मीडियावर टाकण्यास सुरूवात केली होती. यातील प्रथमच मतदान करणारे बहुतांश मतदार युवक युवतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते.

गिरीश महाजन ठाण मांडून
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे मतदान केले. त्यानंतर ते दिवसभर जळगाव शहरात ठाण मांडून होते. महाजन यांनी शहरातील विविध मतदान केंद्रावर फिरून तेथील कार्यकर्त्यांकडून मतदानाचा आढावा घेतांना दिसून आले. मतदान केंद्राभोवती फेरफटका मारला असता मतदारांना व्हीव्हीपॅट मशीनद्वारे आपण कोणाला मतदान केले हे अवघ्या पाच सेकंदात कळत असल्याने अनेक मतदारांनी या प्रक्रियेचे स्वागतच केले असल्याचे दिसून आले.

शेवटच्या टप्प्यात पैशांचा पाऊस
दिवसभर संथगतीने सुरू असलेल्या मतदानानंतर सायंकाळी मतदानाचा जोर वाढावा यासाठी उमेदवारांकडून अक्षरश: पैशांचा पाऊस पाडण्यात आला. शहरातील कंजरवाडा, सिंधी कॉलनी, रामानंदनगर, मेहरुण, तांबापुरा यासह इतर भागात पैशांचे वाटप करण्यात आले. बरेच ठिकाणी 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपयेपर्यत एका फुलीप्रमाणे पैसे वाटप करण्यात आले. बरेच मतदार दिवसभर कोणत्या उमेदवाराकडून किती पैसे येतात या प्रतीक्षेत होते. मात्र एकही रुपया दिवसभरात न आल्याने बहुतेक मतदार हे घरीच थांबले. सायंकाळी मात्र पैसे वाटप सुरू होताच मतदार मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले.

होमगार्डला आली भोवळ
शहरातील भोईटे शाळेतील मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले होमगार्डला फीट येवून भोवळ आल्याची घटना घडली होती. दरम्यान मतदान केंद्रातील इतर सहकारी कर्मचार्‍यांनी लागलीच धाव घेवून त्या होमगार्डला सावरत रूग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!