Type to search

maharashtra जळगाव राजकीय

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 32 हजारांच्यावर लागणार मनुष्यबळ

Share
जळगाव । सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून अवघे 72 तासांचा अवधी उरला आहे. या निवडणूक प्रकियेसाठी 32 हजार 529 कर्मचारी, अधिकारी वर्गासह 2 हजार 75 केंद्रीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी होवू घातलेल्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पार पडण्यासाठी मनुष्यबळ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. इव्हिएम, व्हिव्हिपॅटसह मतदान साहित्य मतदान केंद्रांवर पोचवण्याची तसेच या केंद्रावर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोयी सुविधा आहेत किंवा नाही, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, रॅम्प, दिव्यचक्षुंसाठी मार्गदर्शक आदींची व्यवस्थांची पाहणी देखील शेवटच्या टप्प्यात आहे. जळगाव मतदार संघातील आठ तालुक्यात 16हजार 917 कर्मचारी तर 3 हजार 674 अधिकारी तर रावेर मतदार संघात 10 हजार 244 कर्मचार्‍यांसह 1 हजार 644 अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्हयातील विधानसभा मतदारसंघानुसार जळगाव शहर 2, ग्रामीण भागात 5 क्रिटीकल तर सामाजिक संवेदनशिल 5 असे मतदानकेंद्रांसह अमळनेर 10, पाचोरा येथे 1 असे एकुण 23 तर रावेरमतदार संघात चोपडा 8,रावेर 19,भुसावळ 15, मुक्ताईनगर 3 असे सुमारे 45 मतदान केंद्र क्रिटीकलसह सामाजिकदृष्टया संवेदनशिल आहेत. या केंद्र परीसरात सुरक्षा व्यवस्थादेखिल तैनात करण्यात आली आहे.

जिल्हयातुन 7 हजार 452 सैनिक मतदार राज्यासह देशभरात तिनही दलात कार्यरत सैनिक मतदारांच्या संख्येत सातारा, अ.नगर नंतर जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. देशसेवेसाठी कार्यरत असलेले सैनिक मतदारांची संख्या सर्वात जास्त पाचोरा भडगाव तालुक्यात 1 हजार 796 तर चाळीसगाव 1हजार 522, अमळनेर 909, एरंडोल 755,चोपडा 470, जळगांव ग्रामीण 427, जळगाव शहर 188, रावेर 231,भुसावळ 289, जामनेर 317, शहर 144,मलकापूर 345 असे सैनिक व त्यांचेसोबत असलेले कुटुंब 59 असे त्यांचे मतदान पोस्टल ई-बॅलेट पेपरव्दारे नोंदविण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

लोकशाही प्रगल्भतेसाठी निर्भयपणे मतदान
लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सुमारे 2 हजार 200 पोलीस कर्मचारी तसेच 75 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रलोभन, दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान कराता यावे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची जादाकुमक तैनात करण्यात येणार आहे. निवडणूक काळात होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी समाज कंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन ठिकाणी नाकाबंदीसह प्रत्येक वाहनांची तपासणी कसून केली जाईल. पेट्रोलिंगच्या माध्यमातून योग्य नियोजन पोलीस प्रशासनातर्फे केले आहे. या शिवाय मतदानाच्या दिवशी फ्लाईंग स्कॉडसह खास सीपीएफच्या दोन व एसआरपीची एक कंपनी तैनात राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!