Type to search

maharashtra जळगाव

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहनांची कसून तपासणी

Share
जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस प्रशासनाच्यावतीने दिवसभर चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. शहरातील बहिणाबाई चौक, कालिंका माता मंदिर चौक, काव्यरत्नावली चोैकात नाकाबंदी करून वाहनधारकांवर कारवाई देखील करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वाहनांची तपासणी सुरु होती

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणुकीमध्ये जिल्ह्याच्या सीमेवरून अवैध दारु विक्रीसाठी येत असल्याने तसेच मोठ्या प्रमाणावर रोकड बाळगणार्‍यावर भरारी पथकांची करडी नजर आहे. जळगाव मतदार संघातील पाचोरा व रावेर मतदार संघातील मलकापूर येथे भरारी पथकाने कारमधून लाखो रुपयांची रोकड बाळगणार्‍यांवर कारवाई केली आहे. या दोन्ही ठिकाणावरून वाहनांमध्ये लाखो रुपयांची बेहिशोबी रोकड मिळून आली. याप्रकरणी रोकड कोठून कुठे जात होती. तसेच कारमालकांनी या रोकडबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने ही रोकड भरारी पथकाने ताब्यात घेतली असून याबाबत रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु आहे. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी जिल्हातील सर्व प्रभारी अधिकार्‍यांना हद्दीमध्ये तसेच महामार्गावर वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सायंकाळी शहरातील काव्यरत्नावली चौक, प्रभात चौक, कलिंकामाता मंदिर चौक या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. तसेच ज्या वाहनचालकांकडे वाहनांची कागदपत्रे, लायसन्स नाही या वाहनाधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बहिणाबाई चौकात सायंकाळी 5.30 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत चारचाकी वाहनांची तपासणी सुरु होती.

स्वतंत्र स्थिर निगराणी पथके
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैधरित्या वाहून नेणारी दारू, शस्त्रात्रे यांची वाहतूक रोखण्यासाठी निवडणूक विभागाच्या मदतीने स्वतंत्र स्थिर निगराणी पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके शहरात प्रवेश करणार्‍या लगतच्या रस्त्यावर थांबून येणारी-जेणारी वाहने तसेच संशयास्पद वाहने तपासणी करतील. या पथकामध्ये जिल्हाप्रशासनाचे पदाधिकारी व पोलीस असणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!