Type to search

maharashtra जळगाव

महामार्ग चौपदरीकरणासाठी आठवडाभरात निविदा

Share
जळगाव । नितीन गडकरी यांना विनंती केल्यानंतर त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांनी ‘नही’च्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन अखेर जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाराला मान्यता दिली आहे. महापालिकेने वीजेचे खांब व जलवाहिनीच्या कामांसाठी पाच कोटी भरल्यास आठवडाभरात या कामांची निविदा प्रसिद्ध होईल, अशी माहिती माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपच्या संमेलनासाठी येणार असल्यान जिल्हाभरातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावावे, वेळ द्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली होती. यात महामार्ग चौपदरीकरणाचा विषय होता. दरम्यान, गडकरी यांचा दौरा रद्द झाल्याने त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुधीर देऊळगावकर यांनी बैठक घेतली. यात खासदार ए.टी. पाटील, अपर जिल्हाधिकारी गौरक्ष गाडीलकर यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (नही) अधिकारी उपस्थित होते. महामार्ग चौपदरीकरणाला तत्वतः मान्यता आधीच देण्यात आलेली होती.

तरतूद व निविदा राहून गेलेल्या होत्या. रविवारच्या बैठकीत चौपदरीकरणाला 62.50 कोटी रूपयांची मान्यता ‘नही’ने दिली. दरम्यान, यात महानगरपालिकेने महावितरणचे वीज खांब काढण्यासाठी दीड कोटी तसेच जलवाहिन्या काढण्यासाठी 3.50 कोटी रूपये भरावे लागणार आहेत. महापालिकेने हे पैसे जिल्हाधिकार्‍यांकडे भरण्याची हमी दिल्यास निविदा लवकर निघतील, त्यानंतर आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांना शंभर कोटींच्या निधीतून पाच कोटी द्या, असे सांगितले आहे. त्यांनी ते मान्य केले असून आठवडाभरात निविदा निघतील, असे खडसे यांनी सांगितले.

यासह मुक्ताईनगर व्हाया कोथळी या महामार्गासाठी 50 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून आगामी तीन ते चार महिन्यात यासंदर्भातही निविदा निघतील. तसेच बर्‍हाणपूर-अंकलेश्वर, जळगाव- औरंगाबाद या महामार्गांचाही आढावा घेण्यात आला. बर्‍हाणपूर अंकलेश्वर हा रस्ता आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता त्याचे महामार्गात रूपांतरीत झाल्यामुळे या कामांनाही गती येणार असल्याने त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!