Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशहल्ल्याचा कट उधळला! जम्मू-काश्मीरमधून जैशच्या ४ दहशतवाद्यांना अटक

हल्ल्याचा कट उधळला! जम्मू-काश्मीरमधून जैशच्या ४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांनी चार दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या षड्यंत्राचा पर्दाफाश केला आहे…

- Advertisement -

जैशचे दहशतवादी स्वातंत्र्यदिनी हल्ला करण्याच्या तयारीत होते. ड्रोनद्वारे सोडण्यात आलेली शस्त्रात्रे गोळा करून ते काश्मीरमधील जैशच्या इतर दहशतवाद्यांना पोहोचवणार होते.

१५ ऑगस्टपूर्वी जम्मूमध्ये आयईडी (IED) स्फोट करण्यासह देशातील काही महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना या दहशतवाद्यांकडून आखली जात होती.

दहशतवाद्यांच्या ताब्यातून स्फोटके आणि शस्त्रे आणि जप्त करण्यात आली आहेत. हा हल्ला करण्यासाठी मोटारसायकल आयईडीचा वापर करण्यात येणार होता.

पुलवामा येथून मुंतझीर मंजूरला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक मॅगझिन, आठ जिवंत राऊंड आणि दोन चिनी हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले.

तसेच शस्त्रे नेण्यासाठी वापरला जाणारा एक ट्रकदेखील यावेळी जप्त करण्यात आला. यानंतर जैशचे आणखी तीन दहशतवादी पकडले गेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या