आधुनिक कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाची गरज

0
जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-सध्याच्या प्रचलित अभ्याक्रमामुळे केवळ पेपर इंजिनीअर तयार होत आहेत. परंतु मानसिकता बदलवुन आधुनिक अभ्यासक्रमाद्वारे रोजगार निर्माण करणारे इंजिनीअर तयार होणे अपेक्षित आहे.
आधुनिक कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटी अर्थात बाटू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.जी.गायकर यांनी केले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसीटीच्या उपक्रेंद्राचे कुलगुरू डॉ. व्ही.जी.गायकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बाटूचे रजीस्ट्रार डॉ. एस.एस. भामरे, डॉ. पी.के.कट्टी, प्रा.आर.डी. कोकाटे, जे.टी.महाजन विद्यालयाचे उपाध्यक्ष विजय झोपे, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही.जी. अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक आदी मान्यवर उपस्थित होते.

उपकेंद्राच्या शुभारंभानंतर मान्यवरांनी उपकेंद्रातील सुविधांची पाहणी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरस्वती प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले.

कुलगुरू डॉ. व्ही.जी.गायकर यांनी बाटू विद्यापीठाच्या स्थापनेमागील भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे पहीले महाविद्यालय आहे ज्याठिकाणी उपकेंद्र सुरू झाले आहे.

गोदावरी फाऊंडेशनच्या पुढाकारामुळे हे उपकेंद्र आजपासून कार्यान्वीत झाल्याचे त्यांनी जाहीर केले. सध्याच्या काळात अभियांत्रिकीच्या प्रवेशाची परीस्थीती आपण बघतो आहोत.

पारंपारीक अभ्याक्रमामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. भविष्यात रोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होतील. पण पेपर इंजिनीअरमुळे विद्यार्थ्यांना या संधी उपलब्ध होऊ शकणार नाही.

हीच बाब लक्षात घेत बाटू विद्यापीठाने स्किल्ड अभ्यासक्रम, प्रात्याक्षिक, औद्योगिकीकरणाचे प्रात्याक्षिक, शिक्षकांना प्रशिक्षण या सर्व विषयांना अनुसरून अभ्यासक्रमासह मानसिकताही बदलविण्याचे काम सुरू केले आहे.

खान्देशातील नऊ महाविद्यालय बाटूशी संलग्नीत झाली असली तरी भविष्यात राज्यातील सर्व महाविद्यालये बाटू च्या कार्यक्षेत्रात येतील असा विश्वासही कुलगुरू डॉ. गायकर यांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यापीठाचे रजीस्ट्रार डॉ. एस.एस. भामरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे बाटू विद्यापीठातील सुविधांविषयीची माहिती दिली.

तसेच प्रा. आर.डी. कोकाटे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे बाटू विद्यापीठाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करून मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे.

यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही डॉ. उल्हास पाटील यांनी दिले. यावेळी बाटू विद्यापीठाकडून उपकेंद्र मंजुरीचे प्रमाणपत्र आणि करार विद्यापीठाचे डॉ. एस.एस. भामरे यांच्याकडुन स्विकारण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही.जी. अराजपुरे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*