तांत्रिक शिक्षणाची प्रगती झाल्यास रोजगार संधी

0
जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-सध्याच्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहे. त्यामुळे तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे. तांत्रिक शिक्षणाची प्रगती झाल्यास रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध होतील अशी माहिती बाटु चे कुलगुरु डॉ. व्ही.जी. गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील9 महाविद्यालये बाटु शी संलग्नित झाली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची अधिक कल वाढणार असून प्रवेश घेणार्‍याची संख्या अधिक राहणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी बाटु चा प्रयत्न राहणार आहे. महाविद्यालयांमधून रोजगार निर्माण करणारे इंजिनियर तयार व्हायला हवे.

डिग्री घेवून शिक्षण पूर्ण होत नसल्याची खंत देखील यावेळी डॉ.गायकर यांनी व्यक्त केली. तसेच विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट सेंटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच महाविद्यालय व शिक्षकांवर बाटुचे व्ही.सीद्वारे मॅनेटेरिंग असणार असून दरवर्षी ऑडीट होणार आहे. यावर्षी देखील अनेक कॉलेजचे संलग्नतेसाठी प्रस्ताव होते.

पहिल्या टप्प्यात 65 महाविद्यालये बाटु शी संलग्नीत झाली असून दुसर्‍या टप्प्यात जवळपास 150 महाविद्यालये संलग्नित होण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेवेळी बाटूचे रजिस्ट्रार डॉ. एस.एस. भामरे, डॉ. पी.के.कट्टी, प्रा.आर.डी. कोकाटे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*