Type to search

क्रीडा जळगाव शैक्षणिक

डॉजबॉल स्पर्धेत भाऊसाहेब राऊत विद्यालय विजयी तर बी.यू.एन.रायसोनी इंग्लिश स्कूल उपविजयी

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित मनपा शालेय जिल्हास्तर १७ वयोगट मुले-मुली यांची स्पर्धा आज दि.२९ रोजी बी.यू.एन.रायसोनी विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत मुलांच्या गटात- भाऊसाहेब राऊत विद्यालय विजयी तर बी.यू.एन.रायसोनी इंग्लिश स्कुल उपविजयी, तृतीय बी.यू.एन.रायसोनी मराठी स्कुलने यश संपादन केले.

तर मुलींच्या गटात – बी.यू.एन.रायसोनी इंग्लिश स्कुल विजयी, जयदुर्गा माध्यमिक विद्यालय उपविजयी, तर तृतीय सेंट लॉरेन्स स्कुल यांनी विजय संपादन केला.

स्पर्धेतील विजयी स्पर्धकांसह त्यांना मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक यांचे शाळा, महाविद्याल, क्रिडा विभाग, जिल्हा क्रीडा परिषद यांनी कौतुक केले आहे.

 

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र

भाऊसाहेब राऊत विद्यालय व बी यु एन रायसोनी इंग्लिश स्कुलचे संघ नरडाणा जि धुळे येथे होणाऱ्या नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.

स्पर्धेत पंच म्हणून नितीन पाटील, योगेश पवार, प्रा समीर घोडेस्वार, प्रकाश सपकाळे, उल्हास ठाकरे, उज्वल जाधव, उमाकांत जाधव, चेतन जोशी, मोहित भोई, अभि कापुरे यांनी तर स्पर्धा तांत्रिक समिती प्रमुख म्हणून गिरीश पाटील, मनपा समनव्यक एम एम पाटील यांनी काम पाहिले.

यशस्वी आयोजनासाठी योगेश सोनवणे, विशाल पाटील, प्रफ्फुल गायकवाड, मुकेश परदेशी, प्रसन्न जाधव यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!