Type to search

रॅगिंगला कंटाळून जळगावच्या महिला डॉक्टरची मुंबईत आत्महत्त्या

जळगाव

रॅगिंगला कंटाळून जळगावच्या महिला डॉक्टरची मुंबईत आत्महत्त्या

Share

जळगाव । मुंबईतील भायखळा-मधील नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या जळगावच्या भावी महिला डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत भायखाळा येथील आग्रीपाडा पोलीसात तीन वरिष्ठ महिला डॉक्टरांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला डॉक्टरांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी महिला डॉक्टरचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आला होता.

जळगावातील वाघ नगरमधील रहिवाशी असलेल्या डॉ. पायल तडवी ह्या मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत होत्या. डॉ. पायल तडवी हया आदिवासी भिल्ल असल्याने अनूसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर त्यांना प्रवेश मिळाला होता. वैद्यकीय महाविद्यालयातील सिनीयर डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहर ,डॉ. अंकिता खंडेलवाल या डॉक्टरांनी पायल तडवी हिचा जातीयवाचक बोलून तुला ऑपरेशन थिएटरमध्ये पाय ठेवू देणार नाही, तुला डिलेव्हरी विभागात येवून देणार नाही. अशी धमकी दिली होती.

तसेच व्हॉटस्अप गु्रपमध्येही पायल तडवी यांच्या बाबतीत बदनामीकार मजकूर प्रसारीत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला होता. या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी नायर हॉस्पिटलच्या वस्तीगृहातील खोलीत आत्महत्या केल्याची घटना दि.23 रोजी उघडकीस आली होती. कुटुंबियांनी रॅगिंग करणार्‍या डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्यानंतर रात्री उशिरा डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहर ,डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन डॉक्टरांविरुध्द भायखळा येथील आग्रीपाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पायल तडवी ह्या रॅगिंगच्या बळी ठरल्याने संतप्त कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह जळगावी आणल्यानंतर प्रेतयात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून संशयितांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!