Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगाव जिल्ह्यात लोकसभेसाठी आज मतदान

Share
जळगाव । जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदार संघात आज मंगळवार 23 रोजी जिल्हयातील एकूण 3 हजार 200 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

जळगाव मतदार संघातून 14 तर रावेरमधून 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.जिल्हयातील 26 उमेदवारांचे भवितव्य सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यत मतदान यंत्रात बंद होणार आहे. 310 शहरी तर 818 ग्रामीण मतदान केंद्रावर 2462 इव्हिएमसह 2689 व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतपेटीत बंद होणार आहे.

रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदार संघासाठी 321 राखीव पथकासंह, रावेर विधानसभा मतदार संघातील 319 पथके, भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी 315 पथके, जामनेर विधानसभा मतदार संघासाठी 328 पथके, मुक्तताईनगर विधानसभा मतदार संघासाठी 321 पथके तर मलकापूर विधानसभा मतदार संघासाठी 302 पथके असे सहा विधानसभा मतदार संघातील 1 हजार 906 पथके मतदान केेेंद्रांवर तैनात असणार आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघातील जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त राखीव पथकांसह 393 पथके , जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी 336 पथके, अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी 323 पथके, एरंडोल विधानसभा मतदार संघासाठी 390 पथके, चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी 341 पथके तर पाचोरा विधानसभा मतदार संघासाठी 330 पथके असे सहा विधानसभा मतदार संघासाठी एकुण 2 हजार 013 पथके ईव्हीएम, व्हि व्हि पॅट व मतदान साहित्यासह पोलीस बंदोबस्तात सोमवारी मतदान केेंद्रांवर पोहचले आहेत. जिल्हयात 17 लाख 19 हजार 660 पुरुष तर 16 लाख 39 हजार 732 महिला तर 93 इतर मतदार आहेत. जिल्हयात 7 हजार 992 सर्व्हिस मतदार आहेत.निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या 15 हजार 287 मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे 7 हजार 619 मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हयात 2 हजार 111 ठिकाणी 3 हजार 617 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर 26 हजार 136 अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणूका शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस अधिक्षक 1, अपर पोलीस अधिक्षक 2, उपविभागीय पोलीस अधिकारी 11, पोलीस निरीक्षक 27, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उप निरीक्षक 164 , पोलीस शिपाई 4 हजार 494 तर 1 हजार 392 होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हयातील 362 मतदान केंद्राचे वेबकॉस्टिंग करण्यात येणार आहे. जिल्हयात 36 मतदान केंद्रे क्रिटीकल आहेत. एस आर पीचे 3 प्लॅटून , मध्यप्रदेश पोलीसांचे 3 प्लॅटून, रेल्वे पोलीसांचे 1 प्लॅटून तैनात करण्यात आले आहेत. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी प्रत्येकी एक सर्वसाधारण निरीक्षक, एक खर्च निरीक्षक तर एक पोलीस निरिक्षक व 113 सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

रविवार सायंकाळी 5 वाजेनंतर प्रचार थांबल्यानंतर सोमवारी दिवसभर चोरटया पद्धतीने मतदारांशी संपर्कसाधुन उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचारकरीत होते. दोन्ही मतदार संघात आघाडी विरूद्ध युती अशीच लढत आहे. जिल्हयात एकुण 36 संवेदनशील मतदानकेंद्र असून या केंद्रावर मतदानाच्या वेळी गर्दी होते अशा ठिकाणी चित्रीकरण देखिल करण्यात येणार आहे.

निर्भयपणे मतदान करा – जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता व कोणत्याही प्रलोभनांच्या आहारी न जाता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!