जिल्यातील तीन डीवायएसपींची बदली

0
जळगाव – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील 43 उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश गृहविभाचे उपसचिव यांनी आज जारी केले. यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या नावाचा समावेश आहे.

पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांची जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयातील रिक्त असलेल्या पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी त्याच्या जागी नागपूर जिल्ह्यातील कामठी उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नजीर शेख यांची औरंगाबाद ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर फैजपूर उपविभागीय अधिकारी राजेंद्र राययिंग यांना सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागीच धुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलिस उपअधिकारी नरेंद्र पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी नरेंद्र पिंगळे यांना डिवायएसपी म्हणून पदोन्नती मिळाली होती.

LEAVE A REPLY

*