Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकोरोनाला हरवणार्‍या रुग्णाला सोडले घरी

कोरोनाला हरवणार्‍या रुग्णाला सोडले घरी

जळगाव  – 

जिल्ह्यात कोरोना पॉॅॅझिटिव्ह आढळलेल्या मेहरुणमधील ५४ वर्षीय रुग्णाचे फेरतपासणीतील दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरी सोडले.

- Advertisement -

आता हा रुग्ण घरी गेल्यानंतर नॉर्मल आयुष्य जगू शकतो. त्याने रुग्णालयातून घरी जाताना सर्व वैद्यकीय टीमचे आभार मानले. कोरोनाला हरवल्याचे समाधान त्या रुग्णासह डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसले. त्यामुळे सर्वांनी ‘गो कोरोना, कोरोना गो…’ ची उत्स्फूर्त घोषणा दिली.

मेहरुणमधील हा रुग्ण कोरोनाचा संशयित म्हणून  २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली होती.  त्याची १४ दिवसांनी चाचणी केल्यानंतर अहवाल निगटिव्ह आला. त्यानंतर त्याचा दुसरा अहवाल घेतला, तो ही निगेटिव्ह आला.

त्यामुळे त्याची सुटका जिल्हा प्रशासनाने   बुधवारी दुपारी  केली. त्यास रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले आहे. त्याने प्रकृतीबाबत सतर्क रहावे अशा काही सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या