Type to search

Breaking News जळगाव

जळगाव : भावानेच केली भावाची हत्या

Share

जळगाव । दारू पिण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाल्याने मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात कशाने तरी जोरदार मारल्याने दीपक प्रल्हाद मरसाळे (वय 18) याचा जागीच मृत्यू झाला. दीपकने गळफास घेतल्याचा बनाव आरोपीने केला. परंतु, त्याचा खून झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे त्याचे वडिल प्रल्हाद तान्हू मरसाळे याने आरोप केला असता आरोपीने वडिलांनाही मारहाण केली.

ही घटना 19 रोजी पहाटे 2 वाजेनंतर पिंप्राळा हुडकोतील मातंगवाड्यात घडली. हातमजुरी करणार्‍या कुटुंबात ही दुर्घटना घडली. आरोपीस पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतले. याबाबत मयताचे वडील प्रल्हाद तान्हू मरसाळे यांनी (वय 69) यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ते पत्नी व दोन मुलांसह हुडकोत राहतात. तर त्यांचा मोठा मुलगा जैनाबादमध्ये कुटुंबीयांसह राहतो. दुसरा मुलगा जय मरसाळे (वय 25) पत्नी, मुलांसह तर तिसरा अविवाहित मुलगा दीपक एकाच ठिकाणी राहतात. परंतु, कुटुंब मोठे असल्याने काही अंतरावर राहण्यासाठी भाड्यानेही घर घेतले आहे. जय व दीपकमध्ये दारू, गांजावरुन नेहमीसारखा शुक्रवारी सायंकाळी व रात्री साडेनऊ वाजता वाद झाला. तो घरातील मंडळीने सोडवला. दोघं भाऊ स्वत:च्या मालकीच्या घरात रात्री झोपले. तर इतर मंडळी भाड्याच्या घरात झोपायला गेले होते.

घटना सकाळी आली उघडकीस
शनिवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जय याने भाड्याच्या घरात झोपलेल्या कुटुंबीयांकडे धाव घेतली. दीपकने रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे जयने कुटुंबीयांना सांगितले. सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, दीपकच्या डोक्यास जखम होऊन रक्तस्त्राव झाल्याचे दिसत होते. जमिनीवर सांडलेले रक्त पुसल्याचे लक्षात येत होते. दीपकचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रसंगी घरातील मंडळींसह नातेवाईकांनी आक्रोश केला. संशयित आरोपीने पळापळ केली असता, त्याला परिसरातील नागरिकांनी पकडून ठेवले.

रामानंदनगर पोलिसांत नोंद
रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. मृत दीपक याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, भावजाई, पुतणे असा परिवार आहे. कुटुंबीयांचे सांत्वन नगरसेवक सैफी, बंटी बारी आदींनी सांत्वन केले.

घरच्यांना दमदाटी

जय म्हणाला की, सर्वांना रात्रभर आवाज दिला. मात्र, तुम्हा उठून का आले नाहीत, म्हणून इतरांना विचारणा केली आणि वडिलांनाही शिविगाळ करीत लाकडी दांड्याने मारहाण केली. तुम्हाला पण जिवंत सोडणार नाही, असे आरोपीने धमकावले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!