मोजमाप पुस्तिकेत नोंदीसाठी हजार रुपयांची लाच,अभियंत्यासह ग्रामसेविकेला अटक

0
 जळगाव । दि.22 । प्रतिनिधीपेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाची मोजमाप पुस्तीकेमध्ये नोंद करण्यासाठी लाच घेणार्‍या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब काशिनाथ सोनवणे याला जळगाव अ‍ॅन्टी करब्यशन ब्युरोच्या पथकाने अटक केली.
त्याने बोरखेडा येथील ग्रामसेवक शितल पाटील हिच्या हस्ते 1 हजाराची लाच स्वीकारल्याने पाटील हिलाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील माऊली चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले होते.

काम सुमारे दीड महिन्यापूर्वी पुर्ण झाले. तक्रारदार याने कामाचे सुमारे 1 लाख रुपये जिल्हा परिषदेकडून चावलखेडा ग्रामपंचायतला ऑनलाईन आले होते.

त्यानंतर त्यांनी केलेल्या पेव्हर ब्लॉकचे काम हे उत्कृष्ठ असल्याबाबतची मोजमाप पुस्तकेत नोंद घेवुन त्यावर संबधीत इंजिनिअर हे सही करीत असतात.

त्यामुळे होणार्‍या वार्षिक लेखा परिक्षणात अडचण निर्माण होत नाही. तक्रारदार यांनी केलेल्या पेव्हर ब्लॉकचे काम हे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब काशिनाथ सोनवणे यांना भेटुन नोंद करण्याबाबत विचारणा केली.

त्यावर एक लाखाच्या पाच टक्के म्हणजे 5 हजाराची रक्कम सोनवणे यांनी तक्रादार यांच्याकडे मागीतली. त्यावर 4 हजाराची रक्कम धरणगाव पंचायत समितीमध्ये तक्रादार याने सोनवणे यांना दिली.

उर्वरीत 1 हजार द्यायचे नसल्याने तक्रारदार याने लाचलुपत विभागाकडे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जळगाव जिल्हा परिषद उप विभाग येथील उप विभागीय अभियंता कार्यालयात तक्रारदार याच्याकडून बाळासाहेब सोनवणे यांनी लाचेची मागणी करुन ग्रामसेवक शितल आनंदा पाटील यांच्याहस्ते स्विकारतांना मिळुन आला. त्यामुळे त्याच्याविरुध्द जिल्हापेठ पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*