Type to search

जळगाव

बिडगांव परिससरात आठ दिवसांपासुन संतधार पाऊस : चिंचपाणी धरण न भरल्याने शेतकरी चिंतेत

Share

धानोरा ता.चोपडा 

महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढुन अनेक नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक धरणांमध्येही समाधान कारक पाणीसाठा होत असल्याने आनंद व्यक्त होत आसे. मात्र चोपडा तालुक्याच्या पुर्व भागातील २० ते २५ गावांसाठी सिंचनाच्यादृष्टीने वरदान ठरणाऱ्या चिंचपाणी धरणात आठ दिवसांपासुन सुरू असलेल्या संतधार पावसानंतरही धरणात फक्त मृतसाठा एवढेच पाणी जमा झाले असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे व धरण भागात जोरदार पाऊस पडून ते तुडूंब भरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंधरा दिवसांची दडी मारल्यानंतर सर्वत्र पिके धोक्यात आली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासुन संततधार व भिज पावसाने हजेरी लावत बहुतांश भागात समाधानकारक परिस्थीती झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पुर आले आहेत. धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत आहे. मात्र चोपडा तालुक्याच्या पुर्व भागातील बिडगांव, मोहरद, धानोरा, वरगव्हाण, कुंड्यापाणी, लोणी खर्डी, पंचक, देवगाव, पारगाव यांच्यासह अनेक गांवाना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारे चिंचपाणी धरण गेल्या तीन वर्षांपासून भरतच नसल्याने बागायती शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. जलपातळी कधीनव्हे इतकी खोल गेली आहे. तब्बल ९५% विहीरी यावर्षी कोरड्या पडल्या. तर लाखो रूपये खर्चुन केलेल्या ट्युबवेल्सही बंद पडत आहेत. त्याचा मोठा फटका बसुन यावर्षी शेकडो ऐकरवरील जगवलेल्या केळी परिसरात जळुन गेल्या व शेतकरीवर्ग सिंचनासाठी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापडल्याचे धक्कादायक चित्र यावर्षी परिसरात पहावयास मिळाले. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी. मोठ्या आशेने चिंचपाणी धरण भरण्यासाठी साकडे घालत आहे.

या धरणाचे वसांड्याचे कामही झाल्याने त्याची पाणी पातळीची क्षमताही दहा फुटांनी वाढली आहे. मात्र दुर्दैवाची बाब हे काम झाल्यापासुन ते अद्यापही भरलेच नाही. मात्र यावर्षी गेल्या आठ दिवसांपासुन संतधार पाऊस सुरू आहे. धरणात अद्यापही पाण्याचा फक्त मृत साठाच जमा झाला असला तरि. वातावरणाच्या अंदाजावरून यावर्षी तरी जोरदार पाऊस पडून धरण भरण्याच्या शेतकरी वर्गाच्या आशा उंचावल्या आहेत. हे धरण भरल्याने परिसरातील तब्बल दोन डझनावर गावांना सिंचनासाठी पाण्याची समस्या सुटणार आहे. मात्र आज मितीस मात्र शेतकरी वर्गात चिंतेचेच वातावरण दिसत असुन जंगल भागात जोरदार पाऊस पडेल व हे धरण भरेल अशीच आस लागलेली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!