Type to search

maharashtra जळगाव

‘देशदूत’च्या ‘फोकस’ मालिकेचे सर्वच स्तरातून होतेय कौतुक

Share
जळगाव । साडेपाच लाख लोकसंख्येच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जळगाव शहराची ओळख समस्यांचे शहर म्हणून होवू नये यासाठी तसेच नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, शहरवासियांचे प्रश्न सुटावेत यासाठी ‘देशदूत’ ने शहरातील विविध प्रभागातील समस्यांवर प्रकाशझोत टाकणारी ‘देशदूत फोकस’ ही मालिका सुरु केली आहे. या मालिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

‘देशदूत’ ने गेल्या चार दिवसांपासून शहरवासियांच्या साफसफाई, आरोग्यासह मुलभूत समस्या मार्गी लागव्या यासाठी ‘देशदूत फोकस’ ही मालिका सुरु केली आहे. या मालिकेची महानगरपालिका प्रशासनाने देखील दखल घेतली असून बर्‍याचशा प्रभाागात साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध प्रभागातील नागरिक स्वतःहून देशदूतच्या शहर कार्यालयात संपर्क साधून परिसरातील अस्वच्छेतेसह विविध समस्यांची माहिती देत आहे. ‘देशदूत’ ने सुरु केलेल्या देशदूत फोकस या मालिकेच्या माध्यमातून बर्‍याच प्रभागातील समस्या मार्गी लागल्या असल्याने या मालिकेचे जळगावकरांकडून कौतुक करण्यात येत आहे. आपल्या प्रभागातील समस्या देखील आम्हाला कळवाव्यात असे आवाहन ‘देशदूत’ शहर टिमकडून करण्यात आले आहे.

दरम्यान बागवान मोहल्ला तसेच दालफळ भागातील समस्यांचे वृत्तांकन फोकस या मालिकेत प्रसिध्द होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने लागलीच गंभीर दखल घेत, दोघही भागात जाऊन साफसफाईला सुरुवात केली. ‘देशदूत’मध्ये छापुन येणार्‍या समस्यांच्या वृत्तांमुळे आम्हाला शहराच्या विविध प्रभागातील समस्यांचे आकलन होत असल्याची प्रतिक्रिया देखील आरोग्य विभागाच्या काही कर्मचार्‍यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!