Type to search

जळगाव फिचर्स मुख्य बातम्या राजकीय

जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी ना.अजित पवार यांची निवडीची शक्यता

Share

जळगाव

जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे बळकटीकरण, पक्ष बांधणी आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदावर उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची निवड होण्याचे संकेत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणी पातळीवर वरिष्ठ पदाधिकार्‍यांची चर्चा सुरू आहे. दि.3 रोजी निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी ‘दै.देशदूत’शी बोलतांना दिली.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकत्यार्ंमध्येच नव्हे तर महिला पदाधिकार्‍यांमध्येे देखील गटतट निर्माण झालेले आहेत. अशी तक्रार काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गत आठवडयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या जिल्हा दौर्‍यावर आल्या असताना केल्या होत्या.

यावेळी खासदार सुळे यांनी हा प्रकार ना.जयंत पाटील, प्रभारी दिलीप वळसेपाटील यांच्याकडे कळविणार असून याची दखल घेऊन जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदावर नवीन नियुक्ती संदर्भात विचार सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. त्यानुसार वरिष्ठ स्तरावर ना.अजित पवार यांची जळगाव जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी निवडीची शक्यता वर्तविली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!