Type to search

Breaking News जळगाव

पीकविम्यापासून वंचित शेतकर्‍यांसाठी खडसे थेट दिल्लीला

Share

जळगाव  – 

सन 2018-19 अंतर्गत बहुतांश शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला परंतु त्यांतील 181 शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिले होते. या शेतकर्‍यांची दखल माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे तसेच खासदार रक्षा खडसे यांनी थेट दिल्ली येथे विमा कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापक यांचेकडे चर्चा करून पाठपुरावा केला.

जिल्हयात खरीप 2018-19  या कालावधीत सुमारे 31 हजार 310 शेतकर्‍यांनी पिक विमा नोंदणी करून 6कोटी 71लाख 50हजार रूपये रकमेचा भरणा केला होता.

त्यापैकी बहुतांश शेतकर्‍यांची बॅक खात्यावर एनईफटीव्दारे पिक विमा लाभाची रकम वर्ग करण्यात आली होती. या पिक विमा योजनेतील 181 शेतकर्‍यांसाठी जिल्हा बॅक चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर  व माजी महसूल मंत्री तथा बँक संचालक एकनाथराव खडसे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.

परंतु ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी अद्यापहि पिक विमा नुकसान भरपाई रक्कम शेतकरी यांच्याकडे पाठवलेले नाही. यासंदर्भातमाजी महसूल मंत्री  खडसे व रावेर लोकसभा खासदार रक्षा  खडसे यांनी  आज मंगळवार दि.19  रोजी विमा कंपनीचे चेअरमन  गिरजा कुमार व व्यवस्थापक सौम्या यांची नवी दिल्ली येथे विमा कंपनीकडून तात्काळ शेतकर्यांच्या खात्यांवर विमा रक्कम जमा करण्यासंदर्भात भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व सरव्यवस्थापक एम.टी.चौधरी आदी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!